झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:27 IST2026-05-08T18:26:23+5:302026-05-08T18:27:31+5:30
सापांची ही प्रजाती नेमकी कोणती आहे, यासंदर्भात नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे, वन्यजीवांचे जग हे मानवी कल्पनेपलीकडचे आहे, हेच या अद्भूत दृश्याने दाखवून दिले आहे.

झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
निसर्गाच्या दुनियेत अश अनेक घटना घडतात, ज्या पाहून सर्वच जण थक्क होतात. काहींवर तर विश्वासही ठेवणे कठीण होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सापाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक साप अत्यंत अमोख्या पद्धतीने झाडावर चढताना दिसत आहे. सापाची ही अनोखी 'स्टाईल' पाहून प्राणीप्रेमी आणि नेटकरीही थक्क झाले आहेत.
आपण साप जमिनीवर सरपटताना अथवा झाडावर चढतानाही बघितला असेल. पण या व्हायरल व्हिडिओतील साप काहीशा अनोख्या पद्धतीने झाडावर चढताना दिसत आहे. हा साप चक्क स्वतःच्या शरीराचा वापर करून झाडाच्या खोडाला विळखा घालत, एखाद्या स्प्रिंगप्रमाणे झाडावर चढताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सापाचे हे कसब आणि रुबाब बघून हा व्हिडिओ वारंवार बघितला जात आहे.
Have you seen a SNAKE climb a tree?
— Roseline Kace (@RoselineKace) May 7, 2026
Its quite fascinating and scary at the same time for some reason 😅 pic.twitter.com/oWj7Ai3LI8
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक जण या सापाच्या या शैलीचे अथवा या अनोख्या पद्धतीने झाडावर चढण्याचे कौतुक करत आहेत. तर काही जण, हा व्हिडिओ अंगावर शहारा आणणारा असल्याचे म्हटले आहे. सापांची ही प्रजाती नेमकी कोणती आहे, यासंदर्भात नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे, वन्यजीवांचे जग हे मानवी कल्पनेपलीकडचे आहे, हेच या अद्भूत दृश्याने दाखवून दिले आहे.