Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये राज्यभरातून लोकांची गर्दी झाली आहे. सकाळी अपघात झाल्यानंतर रात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर परत रुग्णालयात नेण्यात आले. ...
दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून टाकणारी आहे, अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केल्या. ...
दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळल्याची माहिती गोजुबावी (ता. बारामती) येथील प्रत्यक्षदर्शी अतुल आटोळे व अनिता आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
Sharad Pawar on Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावूक झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर त्यांनी खुलासा केला. ...