"डॉक्टर, जिल्हाधिकारी म्हणाले, दादांना परत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल", सुप्रिया सुळेंचं आवाहन, जय पवारांच्या अश्रुंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 22:05 IST2026-01-28T22:04:04+5:302026-01-28T22:05:02+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये राज्यभरातून लोकांची गर्दी झाली आहे. सकाळी अपघात झाल्यानंतर रात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर परत रुग्णालयात नेण्यात आले. 

"Doctor, District Collector said, Dada will have to be taken back to the hospital", Supriya Sule's appeal, Jai Pawar burst into tears | "डॉक्टर, जिल्हाधिकारी म्हणाले, दादांना परत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल", सुप्रिया सुळेंचं आवाहन, जय पवारांच्या अश्रुंचा बांध फुटला

"डॉक्टर, जिल्हाधिकारी म्हणाले, दादांना परत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल", सुप्रिया सुळेंचं आवाहन, जय पवारांच्या अश्रुंचा बांध फुटला

'आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागत आहे. आपण उद्या दहा वाजता परत इथे भेटूयात', असे दाटलेल्या कंठाने पार्थ पवारांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले आणि सगळ्याच्या काळजात कालवाकालव झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पार्थिव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रुग्णालयातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. रात्री गर्दी वाढतच गेली. त्यामुळे लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करताना अजित पवारांच्या दोन्ही मुलांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

सायंकाळी सात वाजता रुग्णालयातून अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेण्यात आले होते. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता पार्थिव परत रुग्णालयात न्यायचे आहे, असे सांगण्यात आले.  

दादांना रात्रभर रुग्णालयात ठेवले जाईल - सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "उद्या सकाळी दहा वाजता आपण सगळे इथे जमणार आहोत. दादा पण आपल्याबरोबर दहा वाजता इथे येतील आणि ११ वाजता अंत्यविधी होईल. आता डॉक्टरांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, आपल्याला दादांना परत हॉस्पिटलमध्ये न्यायला लागत आहे. तिथे दादांना रात्रभर ठेवले जाईल. कुणाची गैरसोय झाली असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते."

सुप्रिया सुळे यांच्या आवाहनानंतरही अंत्यदर्शनासाठी जमलेली गर्दी पार्थिवापासून कमी होतच नव्हती. लोक पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येतच होते. आहात तिथूनच दर्शन घ्या, असे आवाहनही लोकांना करण्यात आले. पण, लोक येतच होते. 

जय पवारांना रडू कोसळलं

लोकांना थांबवण्यासाठी जय पवारांनी विनंती केली. जय पवार म्हणाले, "मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी आधीपासून दादांना जेवढं प्रेम दिलं, ते आज मला दिसून येत आहे", असे म्हणत जय पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

रडतच जय पवार म्हणाले, "दादा आपल्या सर्वांच्या मनात आहेत. आपल्याला त्यांच्यासाठी, जसे ते आजपर्यंत लढत आलेत, तसे लढायचे आहे. उद्या सकाळी ११ वाजता तुम्ही सर्व इथे या."

त्यानंतर पार्थ पवारांनी विनंती केली. "उद्या सकाळी आपल्याला इथे जमायचे आहे. विनंती करतो की आपण शांत थांबा. सगळ्यांनी शिस्तीत बाहेर पडावं. आम्ही सगळे उद्या परत इथे येणार आहे. आता आम्हाला दादांना परत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागत आहे. तुमचं सहकार्य लागेल. विनंती आहे की शांत रहा. आम्ही आता दादाला घेऊन जाणार आहे. उद्या सकाळी परत येणार आहे. सगळ्यांना नीट रस्ता दाखवा. महिलांची काळजी घ्या. महिलांना ढकलू नका", असे आवाहन पार्थ पवारांनी दाटलेल्या कंठांनी केले. 

Web Title : अजित पवार का पार्थिव अस्पताल ले जाया गया; बेटों, सुप्रिया की अपील

Web Summary : अत्यंत दुख के बीच, अजित पवार का पार्थिव शरीर अस्पताल लौटाया गया। उनके बेटों और सुप्रिया सुले ने अंतिम सम्मान के लिए जुटी भीड़ से शांति बनाए रखने की अपील की। परिवार के सदस्यों ने सहयोग का अनुरोध किया।

Web Title : Ajit Pawar's Body Taken Back to Hospital; Sons, Supriya Appeal

Web Summary : Amidst immense grief, Ajit Pawar's body was returned to the hospital. His sons and Supriya Sule appealed for calm as crowds gathered for final respects. Emotional scenes unfolded as family members requested cooperation.