ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 20:11 IST2026-05-17T20:09:44+5:302026-05-17T20:11:31+5:30

Pune St Bus Accident: काही प्रवासी थोडक्यात बचावले, गंभीर जखमींवर आळेफाटा येथील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू

Pune ST bus accident on Kalyan-Ahilyanagar route Driver and one passenger dead many seriously injured | ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी

ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी

Pune St Bus Accident: ​आळेफाटा, पुणे: कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी गच्च भरलेली एसटी बस थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातातून काही प्रवासी थोडक्यात बचावले.

​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर बस ही भिवंडी डेपोची होती. सुट्टीचा दिवस असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. महामार्गावरून प्रवास करत असताना गुंजाळवाडी फाटा परिसरात अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्षणात बस थेट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये बस चालक आणि एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.
अपघात होताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, तरुण आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून बसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले.
​आळेफाट्यात उपचार सुरू:
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातातील सर्व गंभीर जखमींना तातडीने आळेफाटा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाकडून अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.

अपघातातील जखमींची अचूक यादी:

​१. कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७०)
२. कमल कोंडीभाऊ वाकचौरे (वय ६७)
३. शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०)
४. वैशाली शंकर शेजाळ (वय २३)
५. मगन सुखदेव पाटोळे (वय ४८)
६. शोभा मगन पाटोळे (वय ३०)
७. शारदा बन्सी मेंगळे / मेंगडे (वय ५९)
८. अश्विनी गणेश बहिरट / बाहिरट (वय ४८)
९. अलका नामदेव गायकवाड (वय ५८)
१०. अरुण शंकर गुंजाळ (वय ५१)
११. दिपाली बबन डोंगरे (वय ३३)
१२. उल्हास तांबे (वय ७०)
१३. यमुना यादव पावसे (वय ६०)
१४. दिव्या संजय पवार (वय २१)
१५. सिद्धेश नितीन काळे (वय १०)
१६. आशा नितीन काळे (वय ३५)
१७. नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८)
१८. सुंदर संदिप येलमर (वय ४०)
१९. मनिषा शिवराम बोहाडे (वय ४०)
२०. प्रतिभा विनोद मंडले (वय २६)

Web Title : एसटी बस खाई में गिरी: दो की मौत, बीस घायल

Web Summary : आलेफाटा, पुणे के पास एक भरी हुई एसटी बस दुर्घटनाग्रस्त हो गई, जिसमें चालक और एक यात्री की मौत हो गई। बस के सड़क से उतरकर खाई में गिरने से बीस अन्य घायल हो गए। स्थानीय ग्रामीणों ने घायलों को बचाने में मदद की, जिन्हें अस्पताल में भर्ती कराया गया है।

Web Title : ST Bus Plunges into Ditch: Two Dead, Twenty Injured

Web Summary : A packed ST bus crashed near Alephata, Pune, killing the driver and a passenger. Twenty others were injured when the bus veered off the road and fell into a ditch. Local villagers assisted in rescuing the injured, who were hospitalized.