Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला

IPL मध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो टॉपला

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 21:11 IST2026-05-17T21:08:21+5:302026-05-17T21:11:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs RR Vaibhav Suryavanshi Breaks Record Of Hitting Most Sixes By Indian In One Edition Of IPL | Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला

Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला

IPL 2026 DC vs RR Vaibhav Suryavanshi Set New Record Of Most Sixes In IPL : आधुनिक क्रिकेट जगतातील 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी याने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नवा इतिहास रचला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने IPL च्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा मोठा विक्रम आपल्या नावे केला. अभिषेक शर्माला मागे टाकत १५ वर्षीय बॅटर जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक ४३ षटकारांसह भारताचा नवा सिक्सर किंग ठरला . कमालीची गोष्ट म्हणजे आयपीएल करिअरमधील आपल्या दुसऱ्याच हंगामात त्याने हा डाव साधला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

१२ सामन्यात ४३ षटकार

IPL च्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम याआधी अभिषेक शर्माच्या नावे होता. २०२४ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक सलामीवीराने ४२ षटकार मारले होते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पाचव्या षटकातील सहाव्या चेंडूवर तिसरा षटकार मारत वैभव सूर्वंशीनं अभिषेकला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. यंदाच्या हंगामात १२ सामन्यात ४३ षटकारांसह तो IPL चा नवा सिक्सर किंग बनला आहे.

Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

IPL मध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय

  • वैभव सूर्यवंशी - ४३* (२०२६)
  • अभिषेक शर्मा - ४२ (२०२४)
  • श्रेयस अय्यर - ३९ (२०२५)
  • विराट कोहली - ३८ (२०१६ आणि २०२४)

वैभव सूर्यवंशीला खुणावतोय ख्रिस गेलचा रेकॉर्ड
 
IPL इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. २०१२ च्या हंगामात कॅरेबियन फलंदाजाने १५ सामन्यात ५९ षटकार मारले होते. जर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहचला तर निश्चितच हा रेकॉर्ड मोडण्याचीही संधी वैभव सूर्यवंशीकडे असेल.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशक हुकले, पण...

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली. एनिग्डीनं सलामीवीर यशश्वी जैस्वाल याला १२ धावांवर माघारी धाडले. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील क्लास शो दाखवला. त्याने २१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकले, पण २१९ स्ट्राइक रेटसह धावा कुटत त्याने दिल्लीच्या गोलंदाजांना बॅकफुटवर ढकलेल्याचे पाहायला मिळाले.

Web Title : वैभव सूर्यवंशी: 15 वर्षीय बना आईपीएल का नया सिक्सर किंग!

Web Summary : वैभव सूर्यवंशी, 15 वर्ष, ने एक सीजन में सबसे अधिक छक्कों का नया आईपीएल रिकॉर्ड बनाया, अभिषेक शर्मा को 43 छक्कों से पीछे छोड़ा। उन्होंने दिल्ली कैपिटल्स के खिलाफ मैच में अपने दूसरे आईपीएल सीजन में यह उपलब्धि हासिल की। सूर्यवंशी ने 21 गेंदों में 46 रन बनाए।

Web Title : Vaibhav Suryavanshi: 15-Year-Old Becomes India's New Sixer King in IPL!

Web Summary : Vaibhav Suryavanshi, 15, set a new IPL record for most sixes in a season, surpassing Abhishek Sharma with 43 sixes. He achieved this feat in his second IPL season during a match against Delhi Capitals. Suryavanshi nearly scored a half-century, hitting 46 runs off 21 balls.