Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

एका फ्रँचायझीसाठी सलामीवीर म्हणून ५५०० धावा करणारा पहिला फलंदाज

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 17:31 IST2026-05-17T17:28:58+5:302026-05-17T17:31:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs RCB Virat Kohli Creates History vs PBKS Becomes The 1st Ever Batsman In IPL History To | Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

IPL 2026 PBKS vs RCB Virat Kohli Creates History vs PBKS  :  धर्मशालाच्या मैदानात रंगलेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार बॅटर विराट कोहली याने अर्धशतकी खेळीसह एका डावात अनेक विक्रमांना गवसणी घातली. श्रेयस अय्यर याने १०० व्या सामन्यात कॅप्टन्सी करताना नाणफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली याने कामगिरीतील सातत्य कायम राखत संघाला दमदार सुरुवात करून देताना ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

एका फ्रँचायझीसाठी सलामीवीर म्हणून ५५०० धावा करणारा पहिला फलंदाज

विराट कोहलीने IPL इतिहासात एक मोठा टप्पा गाठला. एका फ्रँचायझीसाठी सलामीवीर म्हणून ५५०० धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सामन्याआधी त्याला या विक्रमासाठी केवळ ७ धावांची गरज होती. त्याच्याआधी शिखर धवन आणि डेविड वॉर्नर यांनीही IPL मध्ये सलामीवीराच्या रुपात ५५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र त्यांनी अनेक फ्रँचायझींसाठी खेळताना हा पराक्रम केला. विराटने मात्र हा विक्रम फक्त RCB साठी खेळताना केला.

IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!

IPL इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा

या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. IPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा खास विक्रमही आता विराट कोहलीच्या नावे झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा स्वतःचाच विक्रम मागे टाकत पंजाब किंग्स विरुद्ध ११७५ धावा पूर्ण केल्या.

IPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा

  • ११७५*- विराट कोहली विरुद्ध पंजाब किंग्स 
  • ११७४ - विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
  • ११७२ - विराट कोहली विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 
  • ११६१ - रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 
  • ११३४ - डेविड वॉर्नर विरुद्ध पंजाब किंग्स
     

५०० पेक्षा अधिक धावांचा नववा IPL हंगाम

विराट कोहलीने IPL मध्ये नवव्या हंगामात ५०० पेक्षा अधिक धावांचा खास रेकॉर्डही  आपल्या नावे केला आहे.  IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. सलग चार हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करत त्याने ही विक्रमी कामगिरी करून दाखवली आहे, 

IPL हंगामात सर्वाधिक वेळा ५०० पेक्षा अधिक धावांचा रेकॉर्ड 

  • ९ *- विराट कोहली
  • ७ - डेविड वॉर्नर, केएल राहुल
  • ५ - शिखर धवन
    सलग चौथ्या हंगामात ५००+ धावा

विराट कोहलीने सलग चौथ्या IPL हंगामात ५००+ धावा पूर्ण करत आणखी एका खास क्लबमध्ये स्थान मिळवलं.

Web Title : विराट कोहली का रिकॉर्ड तोड़ प्रदर्शन: आईपीएल इतिहास में अभूतपूर्व उपलब्धि!

Web Summary : विराट कोहली ने आईपीएल में एक मील का पत्थर हासिल किया, जो एक ही फ्रैंचाइज़ी के लिए 5500 रन बनाने वाले पहले सलामी बल्लेबाज बने। उन्होंने पंजाब किंग्स के खिलाफ 1175 रन बनाकर सीएसके के खिलाफ अपना ही रिकॉर्ड तोड़ दिया। कोहली ने अब नौ आईपीएल सीज़न में 500+ रन बनाए हैं, जो किसी अन्य खिलाड़ी द्वारा बेजोड़ है।

Web Title : Virat Kohli's record-breaking spree: Unprecedented achievement in IPL history.

Web Summary : Virat Kohli achieved a milestone in IPL, becoming the first opener to score 5500 runs for a single franchise. He also surpassed his own record against CSK by scoring 1175 runs against Punjab Kings. Kohli has now recorded 500+ runs in nine IPL seasons, a feat unmatched by any other player.