मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 17:22 IST2026-05-17T17:21:13+5:302026-05-17T17:22:56+5:30

West Bengal TMC Office Raid: या कारवाईनंतर बनावट आधारकार्डचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे

Big action! Raids on TMC office; Government land documents, more than 100 Aadhaar cards seized | मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त

मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त

West Bengal TMC Office Raid: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयावर रविवारी मोठी कारवाई करण्यात आली. छापेमारीमध्ये १०० हून अधिक आधार कार्ड आणि सरकारी जमिनीच्या अवैध खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सॉल्ट लेक परिसरात असलेल्या या कार्यालयात स्थानिक रहिवाशांनी, जप्त केलेल्या वस्तू ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आधार कार्ड जप्त केली.

स्थानिकांच्या मते, ही आधार कार्ड त्याच स्थानिकांची आहेत ज्यांनी धाड पडल्यावर टीएमसीच्या कार्यालयाकडे धाव घेतली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, टीएमसी कार्यालयात सापडलेली आधार कार्ड स्थानिक रहिवाशांची आहेत. त्यांच्या मते, जेव्हा आधार कार्ड जारी करण्यात आली, तेव्हा ती टीएमसी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली होती. आधार कार्डबद्दल विचारल्यावर, पक्षाचे सदस्य अनेकदा ती अद्याप आलेली नाहीत असे सांगत असत. स्थानिकांनी ४ मे रोजी कार्यालयाला कुलूप लावले आणि जेव्हा कुलूप उघडण्यात आले, तेव्हा आधार कार्ड जप्त करण्यात आली.

बनावट आधार कार्डांचा मुद्दा पुन्हा चर्चेत

पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी आणि बनावट आधार कार्डांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आता, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयातून मोठ्या संख्येने आधार कार्ड जप्त करण्यात आल्यानंतर एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयातून सरकारी जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याने राज्यातील मुख्य विरोधी पक्षाच्या अडचणींमध्येही वाढ होऊ शकते.

मारहाणीच्या आरोपाखाली टीएमसी नगरसेवकाला अटक

भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली तृणमूल काँग्रेसच्या एका नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हुगळी जिल्ह्यातील बैद्यबाटी येथून तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक राजू परुई यांना अटक केली. पोलिसांच्या सूत्रांनुसार, २६ एप्रिल रोजी बैद्यबाटी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे कार्यकर्ते घरोघरी प्रचार करत होते. सायंकाळी ५:३० च्या सुमारास घटनास्थळी पोहोचलेल्या तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक राजू परुई यांनी भाजप कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण केली. भाजप कार्यकर्ते स्नेहांशू महंत यांनी या घटनेसंदर्भात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तृणमूल नगरसेवक राजू परुई यांना अटक केली.

Web Title : बड़ी कार्रवाई: टीएमसी कार्यालय पर छापा, दस्तावेज, आधार कार्ड जब्त

Web Summary : पश्चिम बंगाल में टीएमसी कार्यालय पर छापा; 100 से अधिक आधार कार्ड और भूमि दस्तावेज जब्त। स्थानीय लोगों का दावा है कि आधार कार्ड, जो उन्हें जारी किए गए थे, टीएमसी कार्यालय में रखे गए थे। एक टीएमसी पार्षद को भाजपा कार्यकर्ता पर हमला करने के आरोप में गिरफ्तार किया गया।

Web Title : Major Action: Raid on TMC Office; Documents, Aadhaar Cards Seized

Web Summary : TMC office raided in West Bengal; over 100 Aadhaar cards and land documents seized. Locals claim the Aadhaar cards, issued to them, were held at the TMC office. A TMC corporator was arrested for assaulting a BJP worker.