युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 15:16 IST2026-05-17T15:16:06+5:302026-05-17T15:16:45+5:30

महत्वाचे म्हणजे, हे जहाज १३ मे २०२६ रोजी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून बाहेर पडले. महत्वाचे म्हणजे, पश्चिम आशियात गेल्या ७५ दिवांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असलेल्या तणावामुळे हा सागरी मार्ग सध्या अत्यंत असुरक्षित बनला आहे.

Navigating through a war zone, a ship carrying 20,000 tons of LPG arrives in India know about Here is how it outmaneuvered Iran and the US in the Strait of Hormuz | युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी

युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी

पश्चिम आशियातील भीषण तणावातून वाट काढत एक भारतीय जहाज तब्बल २०००० टन एलपीजी (LPG) घेऊन भारतात पोहोचले आहे. भारतासाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मार्शल आयलँडचा ध्वज असलेले 'सिमी' (Symi) नावाचे जहाज एलपीजी घेऊन रविवारी सकाळी गुजरातच्या कांडला येथील दीनदयाल बंदरावर पोहोचले आहे.

महत्वाचे म्हणजे, हे जहाज १३ मे २०२६ रोजी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून बाहेर पडले. महत्वाचे म्हणजे, पश्चिम आशियात गेल्या ७५ दिवांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असलेल्या तणावामुळे हा सागरी मार्ग सध्या अत्यंत असुरक्षित बनला आहे.

इराण-अमेरिकेला अशी दिली हुलकावणी - 
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) कतारच्या रास लफ्फान टर्मिनलवरून खरेदी केलेल्या या जहाजावर २०००० टन लिक्विड प्रोपेन आणि ब्युटेन लदलेले होते. अमेरिकेची नाकेबंदी आणि ओमानच्या खाडीत इराणी नौदलाचा कडा पहारा असतानाही, जहाजावरील २१ परदेशी क्रू मेंबर्सनी रणनीतिक चाल खेळत, जहाज सुरक्षितपणे बाहेर काढले. युद्धक्षेत्रातून जाताना बुधवारी जहाजाचे 'ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम' (AIS) ट्रान्सपॉन्डर्स तात्पुरते बंद केले होते. यामुळे ते रडारच्या नजरेतून सुटले आणि इराणच्या लारक बेटाजवळ सुखरूप पोहोचले.

चार मंत्रालयांचा समन्वय आणि मोहीन फत्ते... - 
ही संपूर्ण मोहीम फत्ते करण्यासाठी भारत सरकारची चार मंत्रालये सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी दिलेल्या महितीनुसार, डीजी शिपिंग, परराष्ट्र मंत्रालय (MEA), संरक्षण मंत्रालय (MoD), आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकली. मार्च महिन्यापासून या धोकादायक मार्गावरून भारतात पोहोचलेले हे १३ वे जहाज आहे. यापाठोपाठ व्हिएतनामचे ४६,४२७ टन इंधन घेऊन येणारे 'एनव्ही सनशाईन' हे जहाज न्यू मंगलोर बंदराकडे येत आहे.

 

Web Title : युद्ध से बचकर भारतीय जहाज ने होर्मुज जलसंधि से एलपीजी पहुंचाई

Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, 20,000 टन एलपीजी लेकर एक भारतीय जहाज भारत पहुंचा। 'सिमी' जहाज ने रणनीतिक युक्तियों से अमेरिकी और ईरानी निगरानी से बचते हुए होर्मुज जलसंधि पार की, जिसे मंत्रालयों के समन्वय से सहायता मिली। मार्च से यह 13वीं सफल यात्रा है।

Web Title : Indian Ship Dodges War, Delivers LPG Through Strait of Hormuz

Web Summary : Defying Middle East tensions, an Indian ship carrying 20,000 tons of LPG reached India. The 'Symi' navigated the Strait of Hormuz, evading US and Iranian surveillance with strategic maneuvers, aided by inter-ministerial coordination. This marks the 13th successful voyage since March.