निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट

IPL 2026, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. आता स्पर्धेतील साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यातील दोन सामन्यात धोनी खेळण्यासाठी चेन्नईकडून मैदानात उतरू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 15:08 IST2026-05-17T15:07:29+5:302026-05-17T15:08:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026, MS Dhoni: Will he take to the field to play a farewell match? An update is emerging | निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट

निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट

चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. अनफिट  असल्याने तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळला नव्हता. मात्र नंतर फिट झाल्यानंतरही तो संघात परतला नव्हता. आता स्पर्धेतील साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यातील दोन सामन्यात धोनी खेळण्यासाठी चेन्नईकडून मैदानात उतरू शकतो, असे सांगण्यात येत आहे. येत असलेल्या वृत्तानुसार महेंद्रसिंग धोनी हा पूर्णपणे फिट आहे.  तसेच तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज  झालेला आहे. 

महेंद्रसिंग धोनी हा लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या लढतीत  खेळण्यासाठीही फिट होता. मात्र तो मैदानात  उतरला नव्हता. आपल्या समावेशामुळे संघाचं संतुलन बिघडू नयेत, म्हणून धोनीने हा निर्णय घेतला होता. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्सला अपेक्षित सुरुवात करता आली नव्हती. मात्र नंतर कमबॅक करत चेन्नईने प्लेऑफसाठीचं आपलं आव्हान जिवंत ठेवलं होतं. त्यामुळेच विनिंग  कॉम्बिनेशनमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करण्याचा आपला विचार नसल्याचे संकेत धोनीने दिले होते.

दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या लढतीत  चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा धक्का बसला होता. आता प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईला शेवटचे दोन्ही सामने  जिंकणं आवश्यक आहे. या दोन सामन्यांमध्ये धोनी चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद  पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाला या हंगामात दुखापतींचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला. संघाचे अर्ध्याहून अधिक खेळाडू हे दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर गेले आहेत. दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनीचाही समावेश होता. 

Web Title : क्या धोनी विदाई मैच खेलेंगे? सीएसके कप्तान की वापसी पर अपडेट

Web Summary : पहले अनफिट रहे एमएस धोनी चेन्नई के अंतिम दो मैच खेल सकते हैं। पूरी तरह से फिट, वह टीम संतुलन को प्राथमिकता देते हैं। चेन्नई का लक्ष्य शुरुआती झटकों के बाद प्लेऑफ है, चोटों के बावजूद आगामी मैचों में जीत की जरूरत है।

Web Title : Dhoni to Play Farewell Match? Update on CSK Captain's Return

Web Summary : MS Dhoni, previously unfit, may play Chennai's final two matches. Fully fit, he prioritizes team balance. Chennai aims for playoffs after a shaky start, needing victories in upcoming games despite injury setbacks.