DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?

IPL इतिहासातील रियान परागची सर्वात जलद अर्धशतकी खेळी

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 22:35 IST2026-05-17T22:29:21+5:302026-05-17T22:35:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs RR Riyan Parag Disrespects Delhi Capitals With Controversial Celebration Watch Video | DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?

DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?

आयपीएल २०२६ च्या हंगामात ‘चिठ्ठी सेलिब्रेशन’चा ट्रेंड चर्चेत असतानाच आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग हा दिल्ली कॅपिटल्सला डिवचणाऱ्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. एका बाजूला राजस्थानचा संघ दमदार कामगिरी करत असताना सुरुवातीच्या सामन्यांत रियान पराग धावांसाठी संघर्ष करताना दिसला. एवढेच नाही तर तो याआधी ई-सिगारेट प्रकरणावरूनही ट्रोल झाला होता. मात्र, अरुण जेटली स्टेडियमवर अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने केलेल्या हातवाऱ्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांच्या मते, परागने या सेलिब्रेशनमधून दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग दुसरे अर्धशतक अन्...

याआधी  दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) घरच्या मैदानातील सामन्यात त्याने ९० धावांची तुफानी खेळी करत जोरदार पुनरागमन केले होते. आता पुन्हा एकदा दिल्लीकरांसमोर तेवर दाखवल्यावर त्याने अतरंगी सेलिब्रेशन करून वाद ओढावून घेणारे कृत्य केले आहे. 

Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

नेमकं काय घडलं?

राजस्थान रॉयल्सच्या संघाच्या धावफलकावर ८९ धावा असताना माधव तिवारीने सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर रियान पराग मैदानात उतरला. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांच्या गोलंदाजीवर त्याने आक्रमक फलंदाजी केली. परागने अवघ्या २३ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या खेळीत ५ षटकारांचा समावेश होता आणि स्ट्राईक रेट १९६ च्या घरात होता. राजस्थानच्या कर्णधाराने दिल्लीच्या खेळाडूंकडे पाहत हातवारे केले. "मी तुमच्यापेक्षा वेगळ्या स्तरावर खेळतो" असा काहीसा तोऱ्यात त्याने सेलिब्रेशन केले. ही गोष्ट दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा अपमान करणारी आहे, असे बोलले जात आहे.

IPL इतिहासातील रियान परागची सर्वात जलद अर्धशतकी खेळी

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक साजरे करत रियान परागनं खास विक्रम नोंदवला. आयपीएल कारकिर्दीतील त्याची ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. याआधी गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने २७ चेंडूत तर २०२२ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळरु विरुद्ध २९ चेंडूत अर्धशतक साजरे केल्याचा रेकॉर्ड आहे.
 

Web Title : DC vs RR: रियान पराग का अर्धशतक, जश्न ने खड़ा किया विवाद

Web Summary : दिल्ली कैपिटल्स के खिलाफ रियान पराग के अर्धशतक के बाद जश्न ने विवाद खड़ा कर दिया। उनका हावभाव दिल्ली के खिलाड़ियों को ताना मारने जैसा था। इससे पहले भी वो ई-सिगरेट के मामले में ट्रोल हुए थे।

Web Title : DC vs RR: Riyan Parag's Celebration Sparks Controversy After Record Fifty

Web Summary : Riyan Parag's aggressive celebration after his half-century against Delhi Capitals has stirred controversy. His gesture, perceived as taunting, overshadowed his fastest IPL fifty. Previously, he faced scrutiny for e-cigarette issues.