Ajit Pawar Passed Away : मावळच्या विकासासाठी अजित पवारांनी दिला साडेचार हजार कोटींचा निधी 

By विश्वास मोरे | Updated: January 28, 2026 20:44 IST2026-01-28T20:43:01+5:302026-01-28T20:44:09+5:30

भाजपचा गड असलेल्या मावळ तालुक्यामध्ये २०१९ ला परिवर्तन झाले. आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आमदार मिळाला

Ajit Pawar Passed Away: Ajit Pawar gave a fund of Rs. 4.5 thousand crores for the development of Maval | Ajit Pawar Passed Away : मावळच्या विकासासाठी अजित पवारांनी दिला साडेचार हजार कोटींचा निधी 

Ajit Pawar Passed Away : मावळच्या विकासासाठी अजित पवारांनी दिला साडेचार हजार कोटींचा निधी 

 पिंपरी :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावळवर विशेष प्रेम होते. सुनील शेळके यांच्या रूपाने मावळात पहिल्यांदा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आल्यानंतर  गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी दिली. त्यातून विकासकामे सुरु झाली आहेत. रस्ते, विविध प्रशासकीय कार्यालये, रुग्णालये, पोलीस ठाणी आणि कार्ला, देहू तीर्थ क्षेत्र आणि लोणावळा पर्यटन स्थळांचा विकास साधला आहे. 

भाजपचा गड असलेल्या मावळ तालुक्यामध्ये २०१९ ला परिवर्तन झाले. आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आमदार मिळाला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि त्यानंतर महायुतीचे सरकार असताना गेल्या सहा वर्षांमध्ये मावळ परिसराच्या विकासासाठी अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. 

तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या वडगाव गावामध्ये महसूल इमारत, तळेगाव दाभाडेमध्ये नगरपरिषदेची इमारत,  कान्हेफाटा येथे उपजिल्हा रुग्णालय,  लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय, कान्हे ते खांडी अंदर मावळ अशा ३३६ कोटींच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली होती. त्याचबरोबर लोणावळा परिसरातील टायगर पॉईंट येथे स्काय वॉक उभारून त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर पीएमआरडीएच्या वतीने रस्ताविषयक विविध विकासकामे करण्यात आली. त्याचबरोबर तलाठी सर्कल कार्यालय, नवीन पोलीस ठाणे इमारत उभारली. अशा विविध विकास कामांसाठी एकूण ४५६० कोटी ५२ लाख निधी मंजूर केला होता.
... 
२०१७ पासून मावळात निधी 
पहिल्या पाच वर्षात ४२२९.८४ एवढा निधी मंजूर झाला. त्यानंतर २०२४ पासून वर्षभरात नवीन जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत कामे ११४ कोटी ७४ लाख, वडगाव कोर्ट इमारतीसाठी  १०९ कोटी, पीएमआरडीए रस्तेसाठी ८१.५९ कोटी, सायकल ट्रॅक रस्ते उपक्रमासाठी १८.३५ कोटी, आमदार व डोंगरी निधी ७ कोटी
एकूण निधी ४५६० कोटी ५२ लाख निधी मिळाला आहे.

Web Title : अजित पवार ने मावल विकास के लिए ₹4500 करोड़ दिए

Web Summary : अजित पवार ने मावल के विकास के लिए ₹4500 करोड़ आवंटित किए, सड़कों, अस्पतालों और लोनावाला जैसे पर्यटन स्थलों का वित्तपोषण किया। इस निवेश ने 2019 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के प्रतिनिधि के चुने जाने के बाद बुनियादी ढांचे को बढ़ावा दिया।

Web Title : Ajit Pawar's ₹4500 Crore Boost Fuels Maval Development Projects

Web Summary : Ajit Pawar allocated ₹4500 crore for Maval's development, funding roads, hospitals, and tourism spots like Lonavala. This investment, spanning six years, significantly boosted infrastructure and facilities after a Nationalist Congress Party (NCP) representative was elected in 2019.