Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:17 IST2026-04-16T14:17:03+5:302026-04-16T14:17:46+5:30

सोशल मीडियात या महिलेचा व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहे. जी तिच्या बाल्कनीतून नोटांचे बंडल उधळताना दिसत आहे. 

Video: Woman throws Rs 1.5 crore in the air from balcony; People rush to deposit notes | Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड

Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. त्यात एक महिला तिच्या घराच्या बाल्कनीतून नोटा उधळताना दिसत आहे. हा व्हिडिओ चीनचा असल्याचं सांगितले जाते. या महिलेने बाल्कनीत उभे राहून जवळपास १६२२४७ डॉलर्स रोकड हवेत उडवली. 

डेली मेलच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की, चीनच्या ग्वांगडोंगमध्ये एका महिलेने तिच्या आलिशान अपार्टमेटमधून १६१,२४७ डॉलर कॅश म्हणजेच दीड कोटी रुपये हवेत उडवले आहेत. या घटनेची चिनी अधिकारी चौकशी करत आहेत. या नोटा हाँगकाँगचे १ हजार डॉलर होते. जेव्हा ही महिला हवेत नोटा उडवत होती तेव्हा तिथल्या रहिवाशांनी आणि आसपासच्या लोकांनी नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली. ही रोकड खरी असल्याचे प्रॉपर्टी मॅनेजमेंटने पुष्टी दिली. काही रिपोर्टनुसार, या घटनेतील महिलेचे पतीसोबत वाद सुरू आहेत. ही महिला तिच्या कौटुंबिक मित्राच्या आजाराबाबत जाणून नैराश्येत होती असं सांगितले जाते.

परंतु या घटनेमागचे कारण काहीही असो, स्थानिक पोलिसांनी आसपासच्या लोकांना जमा केलेले पैसे पुन्हा परत करण्याचं आवाहन केले आहे. मंगळवारी सकाळी ग्वांगडोंग प्रांतातील शान्तो येथील एका उंच इमारतीहून महिलेने मोठ्या प्रमाणात हाँगकाँग डॉलरच्या नोटा हवेत उडवल्या. या नोटा विखुरलेल्याचे पाहून लोकांची झुंबड उडाली. जास्तीत जास्त नोटा जमा करण्यासाठी लोक सरसावले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत तिच्याकडून पैसे जप्त केले. सोशल मीडियात या महिलेचा व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहे. जी तिच्या बाल्कनीतून नोटांचे बंडल उधळताना दिसत आहे. 


दरम्यान, काही स्थानिकांनी जमा केलेले पैसे पुन्हा परत दिले आहेत. पोलिसांनी या नोटा जमा करण्याचे आवाहन केले आहे. मागील महिन्यात चोंगकिंग येथे अशीच घटना घडली होती. जिथे फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेल्या २ संशयितांनी पुरावे मिटवण्यासाठी खिडकीतून रोकड खाली फेकली होती. परंतु ही सगळी रक्कम जप्त करण्यात आली. हाँगकाँगमध्ये २०१८ साली एक कुख्यात घटना घडली होती. इथल्या कॉइन यंग मास्टर नावाच्या व्यक्तीने छतावरून शेकडो नोटा हवेत उडवल्या होत्या. या गोंधळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

Web Title : महिला ने बालकनी से फेंके नोट; लोगों में मची लूटने की होड़।

Web Summary : चीन में एक महिला ने अपनी बालकनी से लगभग $161,247 (₹1.5 करोड़) फेंके, जिसके बाद निवासियों में पैसे इकट्ठा करने की होड़ मच गई। पुलिस घटना की जांच कर रही है, माना जा रहा है कि यह वैवाहिक समस्याओं और भावनात्मक संकट से जुड़ी है। अधिकारियों ने जनता से एकत्रित धन वापस करने का आग्रह किया।

Web Title : Woman throws cash from balcony; People scramble to collect it.

Web Summary : A woman in China threw approximately $161,247 (₹1.5 crore) from her balcony, leading to a scramble as residents gathered to collect the money. Police are investigating the incident, believed to be linked to marital issues and emotional distress. Authorities urged the public to return the collected money.