Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
NCP Sharad Pawar vs Ajit Pawar in Supreme Court: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे सांगत शरद पवार गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्ह गोठवून नवीन चिन्ह देण्याची मागणी के ...