माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 21:05 IST2026-04-23T21:00:30+5:302026-04-23T21:05:02+5:30
who should not drink matka water : ho should avoid drinking earthen pot water : which health conditions should avoid clay pot water : उन्हाळ्यांत माठातलं पाणी पिणं कुणी टाळावं ?

who should not drink matka water
उन्हाळा सुरू झाला की घराघरांत मातीच्या माठातलं थंडगार पाणी पिण्याची इच्छा होतेच. भर रणरणत्या उन्हाळ्यात, फ्रीजमधील चिल्ड पाण्यापेक्षा मातीच्या माठातल्या गारव्याची ओढ सर्वांनाच लागते. मातीच्या सुगंधासह नैसर्गिकरीत्या थंड झालेलं हे पाणी केवळ तहान भागवत नाही, तर उन्हामुळे होणारी जीवाची काहिली देखील शांत करतं. आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी पिणे हे नेहमीच फायदेशीर मानलं जातं; कारण ते नैसर्गिकरीत्या 'अल्कलाईन' असतं आणि शरीरातील pH पातळी टिकवून ठेवतं(who should not drink cold water from earthen pot).

ho should avoid drinking earthen pot water
नैसर्गिकरित्या थंड राहणारं हे पाणी शरीराला ताजेतवाने करतं आणि उन्हामुळे होणारी उष्णता कमी करण्यास मदत करतं. मात्र, प्रत्येकासाठीच माठातलं पाणी तितकंच फायदेशीर असेल असं नाही. काही विशिष्ट शारीरिक समस्या किंवा प्रकृती असल्यास हेच पाणी त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे आरोग्य लक्षात घेऊन योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच माठातील पाणी पिणं महत्त्वाचं ठरतं.

which health conditions should avoid clay pot water
माठातलं पाणी देखील सर्वांसाठीच वरदान ठरेल असं नाही. अनेकदा आपण थंडगार पाणी पिण्याच्या नादात आपल्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करतो. काही विशिष्ट आजार किंवा शारीरिक तक्रारी असल्यास माठातील पाण्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशाच काही शारीरिक समस्या आहेत ज्यामध्ये माठातील पाणी पिणे टाळणे किंवा काळजीपूर्वक पिणे अत्यंत गरजेचे आहे.

१. वारंवार सर्दी-खोकला होणे :-
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि ज्यांना वातावरणातील बदलामुळे लगेच सर्दी, खोकला किंवा शिंका येण्याचा त्रास होतो, अशा लोकांनी माठातील पाणी जपून प्यावे. विशेषतः सायनसचा त्रास असलेल्या लोकांसाठी माठातील गारवा हानिकारक ठरू शकतो.

२. पचनशक्ती कमकुवत असेल तर :-
ज्यांना वारंवार गॅस, अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होतो, अशा लोकांसाठी माठातील थंड पाणी पचनक्रिया अधिक मंदावू शकते. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. अशा व्यक्तींनी कोमट पाणी किंवा रुम टेम्पप्रेचरला असलेले सामान्य पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी थंड पाणी पिण्यामुळे डोकेदुखी किंवा नाक बंद होण्याचा त्रास वाढू शकतो.

३. दमा किंवा श्वसनाचे विकार असल्यास :-
दमा किंवा श्वास घेण्याशी संबंधित इतर समस्या असलेल्यांसाठी माठातील थंड पाणी पिणे त्रासदायक ठरू शकते. थंड पाण्यामुळे श्वसनलिकेचे आकुंचन होऊ शकते. ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे किंवा दम्याची लक्षणे अधिक तीव्र होणे अशा समस्या उद्भवू शकतात. श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांनी शक्यतो थंड पाणी टाळून साधं पाणी प्यावं.

४. ताप असताना :-
ताप असताना शरीराचे तापमान वाढलेले असते. अशा वेळी अचानक माठातील थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान असंतुलित होऊन रिकव्हरीला वेळ लागू शकतो.

५. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले :-
लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) तुलनेने कमी असते. अशा वेळी माठातील थंड पाणी प्यायल्याने त्यांना सर्दी-खोकला, घसा दुखी किंवा इतर संसर्गाचा (Infections) धोका लवकर होऊ शकतो. तापमानातील थोडासा बदलही त्यांच्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो.

६. घशाचे इन्फेक्शन असल्यास :-
ज्यांना टॉन्सिल्सचा (Tonsils) त्रास आहे किंवा घशात कोणत्याही प्रकारचे संसर्ग (Infection) झाले आहेत, अशा लोकांसाठी माठातील थंड पाणी हानिकारक ठरू शकते. थंड पाण्यामुळे घशातील सूज आणि वेदना अधिक वाढू शकतात, ज्यामुळे गिळताना त्रास होणे किंवा आवाज बसणे अशा समस्या उद्भवतात.

७. सांधेदुखी किंवा वात :-
ज्यांना सांधेदुखी, संधिवात किंवा हाडांचे जुने आजार आहेत, अशा व्यक्तींना माठातील थंड पाणी प्यायल्याने सांध्यांमध्ये कडकपणा आणि वेदना वाढू शकतात.

८. दात संवेदनशील असणे :-
ज्यांचे दात खूप संवेदनशील असतात, त्यांना थंड पाणी पिल्यास दात दुखणे किंवा संवेदनशीलता वाढू शकते.

















