Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ भारतीय घेणार सहभाग; महाराष्ट्राच्या राही, अविनाश, तेजस्वीनी अन् प्रवीणकडून पदकाची आस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:04 AM2021-07-02T11:04:25+5:302021-07-02T11:09:08+5:30

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. यंदाही नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. आतापर्यंत भारतीयांनी ऑलिम्पिक स्पर्धेत ९ सुवर्ण, ७ रौप्य व १२ कांस्य अशी एकूण २८ पदकं जिंकली आहेत. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सर्वाधिक ६ ( २ रौप्य व ४ कांस्यपदक) पदकं जिंकली होती आणि यंदा तो विक्रमही मोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ भारतीय खेळाडू सहभाग घेणार आहेत. जाणून घेऊया संपूर्ण यादी... List of all Indian athletes qualified for the Tokyo Olympics

भारतानं या क्रीडा प्रकारासाठी चार खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुष वैयक्तिक - अतनू दास, तरुणदीप राय, प्रविण जाधव; पुरुष संघ - अतनू दास, तरुणदीप राय, प्रविण जाधव; महिला वैयक्तिक - दीपिका कुमारी; मिश्र संघ - दीपिका कुमारी, अतनू दास

या क्रीडा प्रकारात एकूण १९ खेळाडू सहभाग घेणार आहेत. ट्रॅक अँड रोड इव्हेंट - पुरुष ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत - एमपी जबीर; पुरुष ४ बाय ४०० मीटर रिले - मुहम्मद अनास याहीया, नोहा निर्मल टॉम, अमोज जेकब, अरोकिया राजीव; पुरष २० किमी चालण्याची शर्यत - संदीप कुमार, राहुल रोहीला, इरफान कोलोथूम थोडी; पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस - अविनाश साबळे; महिला १०० मीटर - द्युती चंद; महिला २०० मीटर - द्युती चंद; महिला २० किमी चालण्याची शर्यात - प्रियांका गोस्वामी, भावना जट; मिश्र ४ बाय ४०० मीटर रिले - अद्याप टीम जाहीर झालेली नाही ; फिल्ड इव्हेंट - पुरुष भालाफेक - निरज चोप्रा, शिवपाल सिंग; पुरुष लांब उडी - मुरली श्रीशंकर; पुरुष गोळाफेक - तजिंदरपाल सिंग थूर; महिला थाळीफेक - कमलप्रीत कौर, सीमा पुनिया; महिला भालाफेक - अन्नू राणी

चार भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली आहे. पुरूष एकेरी - साई बी प्रणिथ; पुरुष दुहेरी - सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी; महिला एकेरी - पी व्ही सिंधू

ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आतापर्यंत सर्वात मोठे बॉक्सिंग पथक पाठवत आहे. एकूण ९ खेळाडू या क्रीडा प्रकारात दम दाखवणार आहेत. पुरुष ५२ किलो - अमित पांघल, पुरुष ६३ किलो - मनिश कौशिक, पुरुष ६९ किलो - विकास कृष्णन, पुरुष ७५ किलो - आशिष कुमार, पुरुष ९१+ किलो - सतिश कुमार; महिला ५१ किलो- मेरी कोम, महिला ६० किलो - सिमरनजीत कौर, महिला ६९ किलो - लवलिना बोर्गोहैन, महिला ७५ किलो - पूजा राणी

आशियाई स्पर्धेची दोन पदकं नावावर असलेला फौदा मिर्झा हा टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला पहिला भारतीय आहे.

तामिळनाडूची सीए भवानी देवी ही ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठऱणारी पहिली भारतीय तलवारबाज आहे.

तीन भारतीयांनी या क्रीडा प्रकारातून ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. अनीर्बन लाहिरी, उदयन माने व अदिती अशोक हे ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करतील.

आशियाई आर्टिस्टिक्स जिमनॅटिक्समध्ये कांस्यपदक जिंकणारी प्रणती नायक ही टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

पुरुष संघ - पी आर श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, सुमित, शमशेर सिंग, दीलप्रीत सिंग, गुर्जंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, कृष्णा पाठक, वरुण कुमार, सिमरनजीत सिंग ; महिला हॉकी - सविता, दीप ग्रेस एक्का, निक्की प्रधान, गुरजीत कौर, उदीता, निशा, नेहा, सुशिला चानू पुखरंबामस, मोनिका, नवज्योत कौर, समिला तेटे, राणी, नवनीत कौर, लालरेम्सियामी, वंदना कटारीया, शर्मीला देवी, ई रजनी

ज्युदो - सुशिला देवी

नौकानयन - अरुण लाल, अरविंद सिंग

सेलिंग - विष्णू सारवनान, केसी गणपती, वरुण ठक्कर, नेत्रा कुमानन

पुरुष/महिला १० मीटर एअर रायफल - दिव्यांश सिंग पानवर, दीपक कुमार, अपूर्वी चंडेला, एलावेनील वलारिवन; पुरुष/ महिला - सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, मनू भाकर, यशस्वीनी सिंग देस्वाल; पुरुष / महिला ५० रायफल थ्री पोझिशन - संजीव राजपूत, एश्वर्य प्रताप सिंग तोमर, अंजुम मौदगील, तेजस्वीनी सावंत; महिला २५ मीटर पिस्तुल - मनू भाकर, राही सरनोबत; पुरुष स्कीट - अंगद बाजवा, मैराज अहमद खान; मिश्र टीम १० मीटर एअर रायफल - दिव्यांश सिंग पानवर व एलावेनिल वलारीव्हन आणि दीपक कुमार व अंजुम मौदगिल; मिश्र टीम १० मीटर एअर पिस्तुल - सौरभ चौधरी व मनू भाकर आणि अभिषेक वर्मा व यशस्वीनी सिंग देस्वाल

जलतरण - पुरष १०० मीटर बॅकस्ट्रोक - श्रीहरी नटराज, पुरुष २०० मीटर बटरफ्लाय - साजन प्रकाश, महिला १०० मीटर बॅकस्ट्रोक - माना पटेल

टेबल टेनिस - पुरुष एकेरी - साथियन ज्ञानसेकरन, अचंता शरथ कमल; महिला एकेरी - मनिका बात्रा, सुतिर्था मुखर्जी; मिश्र दुहेरी - अचंता शरथ कमल व मनिका बात्रा

टेनिस - सानिया मिर्झा व अंकिता रैना

वेटलिफ्टिंग - मिराबाई चानू

कुस्ती - पुरूष ५७ किलो - रवी कुमार दाहिया, ६५ किलो - बजरंग पुनिया, ८६ किलो - दीपक पुनिया; महिला ५० किलो - सीमा बिस्ला, ५३ किलो - विनेश फोगाट, ५७ किलो - अंशू मलिक, ६२ किलो - सोनम मलिक