...म्हणून खास आहे उद्या होणारे सूर्यग्रहण, नंतर तब्बल एवढ्या वर्षांनी येणार असा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 01:33 PM2020-06-20T13:33:33+5:302020-06-20T13:48:56+5:30

काही विशिष्ट्य योगांमुळे उद्या होणारे सूर्यग्रहण खास आणि दुर्मीळ ठरणार आहे. सुमारे ३८ वर्षांनंतर हा योग आला असून, यानंतर सुमारे १९ वर्षांनंतर असा योग येणार आहे.

यंदाच्या वर्षातील महत्त्वाची खगोलीय घटना असलेले सूर्यग्रहण रविवारी होत आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. काही विशिष्ट्य योगांमुळे उद्या होणारे सूर्यग्रहण खास आणि दुर्मीळ ठरणार आहे.

या ग्रहणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या २१ जून रोजी हे ग्रहण होत आहे. सुमारे ३८ वर्षांनंतर हा योग आला असून, यानंतर सुमारे १९ वर्षांनंतर असा योग येणार आहे.

या दिवसापासून सूर्याच्या दक्षिणायणास सुरुवात होते. सूर्याच्या दक्षिणायनाची वेळ ही आध्यात्मिक सिद्धी पाठवण्याची वेळ मानली जाते, त्यामुळे या ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे सूर्यग्रहण आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमधून दिसणार आहे. तसेच युरोप आणि अमेरिकेतूनही हे ग्रहण दिसेल.

२१ जून रोजी होणारे हे ग्रहण भारतात सकाळच्या वेळी दिसणार आहे. भारतात सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. दुपारी १२.१० वाजता ग्रहणाचा मध्यकाल असेल. तर ३ वाजून ४ मिनिटांनी ग्रहणाची समाप्ती होईल. ग्रहणाचा पूर्ण कालावधी सहा तासांचा असेल.

सूर्यग्रहण ही महत्त्वाची खगोलीय घटना असली तरी हे ग्रहण पाहताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी फिल्टर चष्म्याचा वापर करा. या सोलर ह्युईंग चष्म्याला सोलर ह्युईंग ग्लासेस, पर्सनल सोलर फिल्टर्स किंवा आयक्लिप्स ग्लासेस म्हणतात.

जर तुमच्याकडे असा चष्मा नसेल तर सूर्यग्रहण पाहण्याची जोखीम पत्करू नका. तसेच दुर्बीण, पिनहोल किंवा टेलिस्कोपमधून ग्रहण पाहू नका.