तळकोकणात मुसळधार! काही ठिकाणी पुरस्थिती, शेती पाण्याखाली, वाहतुकही विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:41 PM2020-07-12T13:41:54+5:302020-07-12T15:20:07+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. तसेच काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले.

काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता.

तर काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.

अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली होती.

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नाले, ओहोळ यांनाही धबधब्यांचे रूप आले होते.