ठाण्यात मोठं झाड पडल्याने चारचाकी गाड्यांचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 10:28 AM2017-08-27T10:28:25+5:302017-08-27T10:31:21+5:30

ठाण्यात झाड पडल्याने चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे.

ठाण्याच्या वसंत विहार येथे आज एक मोठं झाड उन्मळून पडलं.

बंगला क्रमांक 33 आणि 34 जवळ उभ्या असलेल्या काही चारचाकी गाड्यांवर हे झाड पडलं.

सुदैवाने दुर्घटना झाली त्यावेळी तेथे कोणी उपस्थित नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही मात्र गाड्यांचं नुकसान झालंय.