IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का

मुंबई इंडियन्सपाठोपाठ लखनौचीही स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याची आशा संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 23:46 IST2026-05-04T23:27:37+5:302026-05-04T23:46:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 MI vs LSG Mumbai Indians won by 6 wkts Against Lucknow Super Giants New Record Highest Successful IPL Chase Ryan Rickelton Rohit Sharma Shine | IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का

IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का

रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन जोडीच्या सुपर हिट शोच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सने दिलेल्या विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत नवा इतिहास रचला आहे. पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२८ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २२९ धावांचे टार्गेट सेट केले होते. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कधीच केला नव्हता.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पराभवाचा LSG ला मोठा धक्का, MI सारखीच झाली अवस्था

दुखापतीमुळे पाच सामन्याला मुकलेल्या हिटमॅन रोहित शर्माच दमदार कमबॅक आणि रायन रिकल्टनने कामगिरीतील सातत्य दाखवून देत मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग अगदी सहज साध्य केला. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह मुंबई इंडियन्सपाठोपाठ आता लखनौच्या संघाचीही स्वबळावर प्लेऑफ्स तिकीट मिळवण्याची आशा संपुष्टात आली आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला असून उर्वरित सर्व सामने जिंकले तरी मुंबई इंडियन्स आणि लखनौ दोन्ही संघ १४ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. 

वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी 
 

निकोलस पूरनचे वादळी अर्धशतक अन्...  

निकोलस पूरनच्या २१ चेंडूतील ६३ धावांच्या धमाकेदार खेळीशिवाय मिचेल मार्श ४४ (२५), एडन मार्करम ३१ (२५) आणि हिम्मत सिंग ४० (३१) यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या होत्या. मुंबई इडियन्सकडून क़र्बिन बॉशनं सर्वाधिक २ तर अल्लाह गझनफर, विल जॅक्स आणि रघु शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

रोहित-रिकल्टन जोडीचा धमाकेदार शो

विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी रचली. रायन रिकल्टन ३२ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने ८३ धावा केल्या. दुखापतीतून सावरून परतलेल्या रोहित शर्मानं ४४ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. तिलक वर्मा १३ चेंडूत ११ आणि सूर्यकुमार यादव ७ चेंडूत १२ धावांची भर घालून परतल्यावर नमन धीर २३ (१२) आणि विल जॅक्स १० (४) जोडीनं १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संघाचा विजय निश्चित केला.
 

Web Title : रोहित का धमाका! एमआई की रिकॉर्ड जीत; एलएसजी को करारी हार।

Web Summary : रोहित और रिकल्टन के शानदार प्रदर्शन से मुंबई इंडियंस ने लखनऊ के विशाल स्कोर का पीछा करते हुए इतिहास रचा। पूरन के अर्धशतक से एलएसजी ने 228 रन बनाए, लेकिन एमआई ने अपना सबसे बड़ा सफल रन चेज हासिल किया, जिससे एलएसजी की प्लेऑफ की उम्मीदें खतरे में पड़ गईं। दोनों टीमें अंक तालिका में सबसे नीचे हैं।

Web Title : Rohit's Blast! MI's Record Win; LSG Suffers Major Defeat.

Web Summary : Riding on Rohit and Riculton's heroics, Mumbai Indians chased down Lucknow's massive score, creating history. Pooran's fifty propelled LSG to 228, but MI achieved their highest successful chase, jeopardizing LSG's playoff hopes. Both teams are at the bottom of the points table.