लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेबांचा पुतळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 01:18 PM2017-12-26T13:18:12+5:302017-12-26T13:47:52+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे.

वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांच्या हातांनी हा पुतळा साकारण्याची किमया केली आहे.

लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम या नावाने दहा वर्षापुर्वी सुरु करण्यात आले होते.

देश पातळीवरील विविध राजकिय व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड व हॉलिवूडचे कलाकार, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती असे सुमारे 90 मेणाचे पुतळे याठिकाणी बनविण्यात आले आहेत.