बाळासाहेब ठाकरेFOLLOW
Balasaheb thackeray, Latest Marathi News
हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.