किस्से जीवघेण्या किसचे...किस करणं पडलं महागात, 'या' सहा लोकांना गमवावा लागला जीव!

Published: April 6, 2020 01:08 PM2020-04-06T13:08:35+5:302020-04-06T13:43:19+5:30

किसच्या या 6 केसेस फार गाजल्या होत्या. म्हणजे किसमुळे सहा लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. कसा ते जाणून घेऊ....

किस करणं हा किती आनंददायी अनुभव असतो हे अनेकांना माहीत असेल. पण किसमुळे कुणाचा जीव गेला असं फार क्वचित तुम्ही ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेलच. पण आज आम्ही तुम्हाला किसचे काही विचित्र किस्से सांगणार आहोत. किसच्या या 6 केसेस फार गाजल्या होत्या. म्हणजे किसमुळे सहा लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. कसा ते जाणून घेऊ....

माओ आनशेंग - टेलिग्राफ यूकेच्या एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये 2007 साली चिन चिनफेंग नावाच्या एका महिलेने तिचा पार्टनर माओ आनशेंगची हत्या केली होती. दोघांमध्ये करार झाला होता की, दोघांपैकी कुणीही दगा दिला तर एक दुसऱ्या पार्टनरची हत्या करेल. एक दिवस माओ एका दुसऱ्या महिलेसोबत बोलत होता. चिनने हे पाहिलं आणि माओची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा चिन माओला भेटली तेव्हा तिने प्लास्टिकमध्ये उंदीर मारण्याचं औषध गुंडाळलं. चिन हे विष तिच्या जिभेखाली दाबून ठेवलं होतं. जेव्हा दोघांनी एकमेकांना किस केलं तेव्हा चिनने चलाखीने ते विष माओच्या तोंडात सोडलं. माओला काहीत कळालं नाही. माओचा मृत्यू झाला. नंतर यासाठी चिनला दोषी ठरवण्यात आलं. (सांकेतिक छायाचित्र)

ज्युलिओ मॅसियास गोंजालेज - इंडिपेंडेंट यूकेच्या एका रिपोर्टनुसार, मेक्सिकोमध्ये एका 17 वर्षीय तरूणाचा ऑगस्ट 2016 मध्ये मृत्यू झाला होता. गोंजालेजच्या 24 वर्षीय गर्लफ्रेन्डने त्याला किस केलं होतं. ज्यामुळे त्याच्या मानेवर लाल निशाण तयार झालं होतं. सामान्यपणे याने काही समस्या होत नसेत. पण गोंजालेजच्या केसमध्ये वेगळं झालं. त्याच्या मानेवर रक्ताची गाठ तयार झाली. ही गाठ त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचल्याने त्याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. त्यातच त्याचं निधन झालं.

एबी फेंसटरमेकर - 2009 च्या सुरूवातीला अमेरिकेतील ओहियोत राहणारा जॉन स्ट्राइक एका जीवघेण्या ई.कोली बॅक्टेरियाचा शिकार झाला होता. त्याने एक बर्गर खाल्लं होतं जे दूषित पाण्यापासून तयार केलं होतं. या बर्गरमुळेच त्याला ई.कोली बॅक्टेरियाने शिकार केलं होतं. काही दिवस आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. इथे तो बरेच दिवस राहिला. तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाण्याच्या काही दिवसांनंतर त्याची सात वर्षांची नात ऐबी आजारी पडली होती.

सुरूवातीला तिचं आजारी पडणं सामान्य वाटलं. पण एका आठवड्यात तिचं वजन 1 किलो कमी झालं. नंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 10 दिवसात तिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि तिचा ब्रेन ड्रॅमेज झाला. ती कोमात गेली आणि काही दिवसांनी तिचं निधन झालं.

चौकशीतून समोर आलं की, तिलाही ई.कोली बॅक्टेरियाने शिकार केलं होतं. झालं असं होतं की, तिचे आजोबा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये होते तेव्हा ती त्यांना भेटायला गेली होती आणि त्यांनी तिच्यावर गालावर किस केलं होतं. त्यामुळे बॅक्टेरियाची लागण तिलाही झाली होती.

एंथनी पॉवेल - बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतील तुरूंगात कैस असलेला एंथनी पॉवेल नावाच्या कैद्याला विषारी किसमुळे आपला जीव गमवावा लागला होता. एंथनीची गर्लफ्रेन्ड मेलिसा ऐन ब्लेअर 2 जून 2016 ला त्याला भेटायला गेली होती. दोघांनी बराच वेळपर्यंत एकमेकांना किस केलं. त्यानंतर काही तासांमध्ये एंथनीचा मृत्यू झाला. नंतर असं समोर आलं की किसच्या माध्यमातून ब्लेअरने तिच्या बॉयफ्रेन्डच्या तोंडात एक ड्रग मेथामफेटामाइंसचे सात बलून पास केले होते. त्यातील दोन बलून हे लगेच फुटले आणि पॉवेलच्या पोटात गेले. याने त्याचा मृत्यू झाला.

मिरियम डूकरे - इंडिपेडेंट यूकेच्या एका रिपोर्टनुसार, ऑक्टोबर 2012 मध्ये कॅनडातील मॉन्ट्रीलमध्ये मिरिअम डूकरे नावाच्या एका 20 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. झोपण्याआधी तिने तिच्या बॉयफ्रेन्डला किस केलं होतं.

त्यानंतर मिरिअमला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. नंतर समजलं की, तिच्या बॉयफ्रेन्डने पीनर बटर सॅन्डविच खाल्लं होतं आणि मिरिअमला पीनटची अॅलर्जी होती. तिची स्थिती नाजूक झाल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहचत नव्हतं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.