World Hockey League Final 2017 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 11:10 PM2017-12-01T23:10:24+5:302017-12-01T23:12:09+5:30

भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली.

अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे विजयाने हुलकावणी दिली. हा सामना १-१ ने बरोबरीत सुटला.

कलिंगा स्टेडियमवर विद्युत प्रकाशझोतात घरच्या प्रेक्षकांपुढे रंगलेला हा सामना अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण ठरला. भारताने या सामन्यावर बराचवेळ वर्चस्व गाजविले.

चेंडू अधिकाधिक वेळ ताब्यात ठेवला. पण गोल नोंदविण्याची वेळ येताच चुका केल्यामुळे पाहुण्या संघावर आघाडी घेता आली नाही. सामन्यात २० व्या मिनिटाला भारताने पहिला गोल करीत आघाडी मिळविली.

ड्रॅगफ्लिकर मनदीपसिंग याने हा गोल केला. तथापि भारतीय खेळाडूंना आनंद साजरा करण्याची वेळच मिळाली नाही. पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर जेरेमी हेवर्ड याने गोल करीत बरोबरी साधून दिली.

टॅग्स :हॉकीHockey