भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:58 IST2026-05-09T11:44:31+5:302026-05-09T11:58:38+5:30

Suvendu Adhikari Oath Ceremony: नुकत्याच झालेल्या पश्चिम  बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आज सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रवी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ  दिली.

Suvendu Adhikari Oath Ceremony: Saffron kurta, saffron tiara..., Suvendu Adhikari takes oath as Chief Minister of Bengal | भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नुकत्याच झालेल्या पश्चिम  बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह ऐतिहासिक  विजय  मिळवला होता. त्यानंतर आज सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रवी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ  दिली. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय  गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध राज्यांतील भाजपा आणि एनडीएचे मुख्यमंत्री आणि इतर  ज्येष्ठ  नेते उपस्थित होते. 

हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शपथविधीसाठी भगवा कुर्ता आणि भगवा टिळा लावून करून आलेल्या सुवेंदू अधिकारी यांची वेशभूषा हा चर्चेचा विषय ठरली होती. तसेच राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या वरिष्ठ  नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि शुभेंच्छांचा स्वीकार केला. 

आज झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत, भाजपाचे  ज्येष्ठ नेते दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशित प्रामाणिक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

दरम्यान, केंद्रीय निरीक्षक अमित शाह, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची भाजपाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू यांच्या नावाची घोषणा केली होती. ४ मे रोजी लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने २९४ जागांपैकी २०७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर तृणमुूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला केवळ २ आणि डाव्या पक्षांना केवळ १ जागा मिळाली होती. 

Web Title : सुवेंदु अधिकारी ने पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री पद की शपथ ली

Web Summary : भाजपा की जीत के बाद सुवेंदु अधिकारी ने पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली। समारोह में प्रधानमंत्री मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ और देवेंद्र फडणवीस सहित कई प्रमुख नेता उपस्थित थे।

Web Title : Suvendu Adhikari takes oath as West Bengal Chief Minister

Web Summary : Suvendu Adhikari was sworn in as West Bengal's Chief Minister following the BJP's victory. The ceremony was attended by Prime Minister Modi, Amit Shah, Yogi Adityanath, and Devendra Fadnavis, among other prominent leaders.