Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:06 IST2026-05-09T13:04:58+5:302026-05-09T13:06:01+5:30

Astro Tips: देवपूजेत आपण तल्लीन होतो, त्यावेळेस योगायोगाने काही गोष्टी घडतात, ज्याचा अर्थ आपल्याला उमगत नाही, त्याबाबत ज्योतिष शास्त्राने केला खुलासा. 

Astro Tips: How to know if God has heard your prayer? The exact meaning of these 5 signs you get during worship | Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ

Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ

हिंदू धर्मात देवाची पूजा करताना अनेकदा काही विशिष्ट अनुभव येतात, ज्यांना आपण देवाचे संकेत मानतो. शास्त्रानुसार, या खुणा म्हणजे ईश्वरी शक्ती आपल्या श्रद्धेला प्रतिसाद देत असल्याचा पुरावा असू शकतात.

हे ही वाचा : Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!

भक्तीमध्ये तल्लीन होऊन पूजा करताना जर काही सुखद अनुभव आले, तर ते केवळ योगायोग नसतात. ज्योतिष आणि पुराणानुसार, हे संकेत तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांची नांदी असू शकतात.

१. देवाच्या मूर्तीवरील फूल पडणे

पूजेदरम्यान किंवा आरती करताना जर देवाच्या मूर्तीवरील किंवा फोटोवरील फूल तुमच्यासमोर पडले, तर ते अत्यंत शुभ मानले जाते.

अर्थ: याचा अर्थ असा की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

काय करावे? ते फूल प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावे.

हे ही वाचा : सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!

२. दिव्याची ज्योत मोठी होणे किंवा प्रज्वलित राहणे

जर दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत अचानक मोठी झाली किंवा आरती पूर्ण होईपर्यंत ती शांतपणे तेवत राहिली, तर ते साक्षात ईश्वरी अस्तित्वाचे लक्षण आहे.

अर्थ: तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत आहे आणि घरातील संकटे दूर होणार आहेत.

३. अगरबत्तीचा धूर आणि सुवास

काहीवेळा अगरबत्तीचा धूर विशिष्ट आकार (जसे की 'ॐ' किंवा चक्र) धारण करतो किंवा त्याचा सुवास अचानक संपूर्ण घरात पसरतो.

अर्थ: हे तुमच्या पितरांच्या आशीर्वादाचे आणि घरातील वास्तू शुद्ध झाल्याचे प्रतीक मानले जाते.

हे ही वाचा : Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!

४. पूजेच्या वेळी पाहुणे किंवा भिक्षुक येणे

जर तुम्ही पूजा करत असताना दारात अचानक एखादा अतिथी, भिक्षुक किंवा गाय आली, तर ते भाग्याचे लक्षण आहे.

अर्थ: 'अतिथी देवो भव' या उक्तीनुसार, प्रत्यक्ष देवच एखाद्या रूपात तुमच्या दारी आल्याचे मानले जाते. अशा वेळी त्यांना रिकाम्या हाती पाठवू नका.

५. डोळ्यांत पाणी येणे किंवा अंगावर काटा येणे

काहीवेळा नामस्मरण करताना मन इतके भरून येते की डोळ्यांतून पाणी येते किंवा अंगावर शहारे येतात.

अर्थ: हे तुमच्या अंतर्मनाचा ईश्वराशी झालेला खरा संवाद आहे. तुमची भक्ती शुद्ध असून तुम्ही देवाच्या जवळ पोहोचला आहात, हेच यातून सिद्ध होते.

Web Title : एस्ट्रो टिप्स: पूजा के दौरान भगवान ने आपकी प्रार्थना सुनी, ऐसे पहचानें

Web Summary : हिंदू धर्म में पूजा के दौरान कुछ अनुभव प्रार्थनाओं के जवाब का संकेत देते हैं। मूर्ति पर फूल गिरना, दीये की लौ बढ़ना, सुगंधित धूप, अप्रत्याशित अतिथि और भावुक आँसू प्रार्थनाओं के फलित होने का संकेत हैं।

Web Title : Astro Tips: Signs God Heard Your Prayer During Hindu Worship

Web Summary : During Hindu worship, certain experiences indicate divine response to prayers. Dropped flowers, a bright flame, fragrant incense, unexpected guests, and emotional tears signify answered prayers and blessings.