गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:45 IST2026-05-09T13:45:16+5:302026-05-09T13:45:47+5:30

Suvendu Adhikari Oath Ceremony: पश्चिम बंगाल सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर आले तेव्हा त्यांनी तिथे बसलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तेव्हापासून  मोदींनी नमस्कार  केलेली ज्येष्ठ व्यक्ती कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

Suvendu Adhikari Oath Ceremony: Hugs were exchanged, greetings were exchanged, Prime Minister Modi bowed down to someone on the stage, who was that senior person Makhanlal Sarkar? | गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?

गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?

पहिल्यांदाच  पश्चिम बंगालच्या सत्तेवर आलेल्या भाजपाच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी आज कोलकाता येथील  ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पार पडला. यावेळी भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची तर  इतर पाच नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ  घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान  नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यादरम्यान एक अशी घटना घडली जिची आता राजकीय वर्तुळात  आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे मंचावर आले तेव्हा त्यांनी तिथे बसलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तेव्हापासून  मोदींनी नमस्कार केलेली ज्येष्ठ व्यक्ती कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

तर पंतप्रधान  नरेंद्र मोदी हे मंचावर उपस्थिती असलेल्या मान्यवरांसह हजारोंच्या जनसमुदायासमोर ज्या व्यक्तीचे पाय धरून नतमस्तक झाले त्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव आहे माखनलाल सरकार. माखनलाल सरकार यांनी एकेकाळी श्यामाप्रसाद  मुखर्जी यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील  लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला होता. तसेच  माखनलाल सरकार हे पश्चिम बंगालमधील भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. 

माखनलाल सरकार यांना १९५२ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह अटक करण्यात आली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माखनलाल सरकार यांनी अनेक राष्ट्रवादी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी डाव्या पक्षांविरोधात दीर्घकाळ लढा दिला होता. तसेच  १९८० मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पक्षा जिल्ह्याध्यक्षापासून ते इतर विविध पदे भूषवली होती. 

दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीसाठी जेव्हा नरेंद्र मोदी हे मंचावर  आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम माखनलाल सरकार यांची विचारपूस करून त्यांना वाकून नमस्कार केला. तसेच त्यांचा शाल देऊन सन्मानही केला. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसेच मोदी ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले ते वृद्ध व्यक्ती नेमके कोण याची चर्चा सुरू झाली होती.   

Web Title : बंगाल शपथ ग्रहण समारोह में पीएम मोदी ने भाजपा नेता को नमन किया।

Web Summary : पश्चिम बंगाल शपथ ग्रहण समारोह के दौरान, पीएम मोदी ने माखनलाल सरकार को नमन किया, जो भाजपा पश्चिम बंगाल के संस्थापक सदस्य हैं, जिन्होंने कभी श्यामा प्रसाद मुखर्जी के साथ भारतीय ध्वज फहराया था। 1952 में गिरफ्तार, सरकार एक लंबे समय से पार्टी कार्यकर्ता हैं।

Web Title : PM Modi bows to veteran BJP leader at Bengal oath ceremony.

Web Summary : During a West Bengal oath ceremony, PM Modi bowed to Makhanlal Sarkar, a founding member of BJP West Bengal, who once hoisted the Indian flag with Syama Prasad Mukherjee. Sarkar, arrested in 1952, is a long-time party worker.