कोण आहे ही भारतीय सुंदरी? चमचे-वाट्यांचा मेटॅलिक मास्कनं वेधले लक्ष; १,७७० कोटींच्या संपत्तीची मालकीण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:54 IST2026-05-05T17:45:56+5:302026-05-05T17:54:20+5:30
भारतीय सुंदरी चर्चेत आली आहे. जिनं यंदा मेट गालामध्ये पदार्पण केलं.

फॅशनची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मेट गाला'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. 'मेट गाला २०२६'च्या रेड कार्पेटवर अनेक तारे तारकांनी आपला जलवा दाखवला. जगभरातील सेलिब्रिटींचे भन्नाट स्टाइल्स पाहायला मिळाले.

अशीच एक भारतीय सुंदरी चर्चेत आली आहे. जिनं यंदा मेट गालामध्ये पदार्पण केलं. ही सुंदरी एका मोठ्या उद्योगपतीची लेक असून तब्बल १,७७० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. मेट गालामधील तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ही दुसरी तिसरी कोणी नाही तर अनन्या बिर्ला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची लेक आणि संगीताच्या जगतातील प्रसिद्ध नाव अनन्या बिर्ला हिनं यंदा मेट गालामध्ये पदार्पण केलं आहे.

अनन्या बिर्लाचा हटके लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अनन्या बिर्लाच्या लूकला पसंती दर्शवली आहे.

अनन्याचा लूक खूपच स्टायलिश दिसत होता, मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ती तिच्या मेटॅलिक मास्कची.

रिपोर्ट्सनुसार, कोट्यवधींची मालकीण असलेल्या अनन्याने या डेब्यूसाठी स्टायलिस्ट रिया कपूर हिच्यासोबत काम केलं. तिने प्रसिद्ध डिझायनर रॉबर्ट वुन यांचा आउटफिट परिधान केला होता. ब्लॅक ब्लेझर-स्टाइल बॉडिस, पेपलम डिटेलिंग आणि स्काय ब्लू शर्टच्या कॉम्बिनेशनमुळे तिचा लूक खूपच शार्प आणि ग्लॅमरस दिसत होता.

तिने या ब्लेझरसोबत फ्लोअर-लेंथ, व्हॉल्यूमिनस प्लीटेड स्कर्ट परिधान केली होती. या स्कर्टच्या शाइन आणि प्लीट्समुळे लूकमध्ये खास मूव्हमेंट आणि ड्रामा आला होता.

या संपूर्ण लूकची खरी हायलाइट ठरला तो तिचा फ्यूचरिस्टिक मेटॅलिक फेस मास्क. हा मास्क प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी डिझाइन केला होता. स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेल्या या स्कल्प्चरल डिझाइनने तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता.

ज्वेलरीबाबत अनन्याने मिनिमल स्टाइल ठेवली. तिने स्वतःच्या कलेक्शनमधील डायमंड चोकर आणि Mehta & Sons चे इअररिंग्स परिधान केले होते. त्यासोबत मेटॅलिक नेल आर्टही तिच्या लूकशी परफेक्ट मॅच होत होते.

अनन्या आता ३१ वर्षांची असून तिची अंदाजित एकूण संपत्ती ₹१,००० कोटी ते ₹१,७७० कोटी इतकी आहे.

अनन्या बिर्ला हिने लहान वयामध्येच संगीतामध्ये आवड निर्माण केली होती. ११ व्या वर्षी तिने संतूर वाजवणे शिकून घेतले होते. २०१६ मध्ये संगीताच्या जगतात पाऊल ठेवल्यानंतर अनन्याने अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. २०२० मध्ये अनन्या लॉस एंजिल्समध्ये मेवरिक मॅनेजमेंटसोबत करार करणारी पहिली भारतीय आर्टिस्ट बनली. त्यानंतर तिने लेट देयर बी लव्ह आणि एव्हरीबडीज लॉस्ट प्रसिद्ध केले.

















