Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:02 IST2026-04-30T12:58:25+5:302026-04-30T13:02:18+5:30

Happy Maharashtra Din 2026 Wishes in Marathi: १ मे रोजी साजरा होणारा 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' हा प्रत्येक मराठी मनासाठी सार्थ अभिमानाचा आणि श्रमिकांच्या अमूल्य कष्टाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी खास आणि आकर्षक शुभेच्छा संदेशांची एक सुंदर फोटो गॅलरी तयार केली आहे. आपल्या राज्याप्रतीचा स्वाभिमान आणि कामगारांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे शुभेच्छा संदेश तुम्ही आपल्या मित्र-परिवारासोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जन्मलो ज्या मातीत ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी... सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

दगड होईन तर सह्याद्रीचा माती झालो तर महाराष्ट्राची तलवार झालो तर आई भवानीची होईन माझ्या महाराष्ट्राचेच गुणगान गाईन... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

गड-किल्ल्यांचा इतिहास जागे, मराठ्यांचा पराक्रम गाजे, महाराष्ट्र दिन साजरा करूया, स्वाभिमानाचा झेंडा फडकवूया! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

बहु असोत सुंदर संपन्न की महा... प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

महान संतांची जन्मभूमि विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम,आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...!

मराठी अस्मिता, संस्कृती आणि अभिमान जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा...! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र