Bajaj ची लोकप्रिय Pulsar आता 350cc इंजिनसह लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:36 IST2026-04-23T13:31:18+5:302026-04-23T13:36:47+5:30
Bajaj ने आपल्या लोकप्रिय Pulsar NS400Z चे नवीन 350cc व्हर्जन लॉन्च केले आहे.

भारतातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj Auto ने आपल्या लोकप्रिय Pulsar NS400Z या बाईकचे नवीन 350cc व्हर्जन लॉन्च केले आहे. या बदलामागे प्रमुख कारण म्हणजे नवीन कररचना. 400cc सेगमेंटवरील जास्त कर टाळण्यासाठी कंपनीने इंजिन क्षमता कमी करून 350cc बाईक आणली आहे, ज्यामुळे किंमत नियंत्रित ठेवता येईल आणि ग्राहकवर्ग वाढवता येईल.

इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये काय बदल? नवीन Pulsar NS400Z मध्ये लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन कायम ठेवण्यात आले असले तरी त्याची क्षमता कमी करण्यात आली आहे. आधी या बाईकमध्ये 373cc इंजिन होते, जे आता कमी करून 349.13cc करण्यात आले आहे. या बदलानंतर बाईक 40.6 PS पॉवर आणि 33.2 Nm टॉर्क निर्माण करते.

पॉवरमध्ये किंचित घट झाली असली तरी राइडिंग अनुभवावर फारसा परिणाम जाणवत नाही. कंपनीने इंजिन ट्यूनिंग अशा प्रकारे केले आहे की, हाय स्पीडवर बाईक अधिक चांगली कामगिरी करते. नवीन इंजिनमध्ये स्ट्रोक कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे इंजिनचा स्वभाव बदलला आहे.

आता जास्त RPM वर चांगली कामगिरीमात्र पूर्वीपेक्षा पावर डिलिव्हरी उशिरा मिळते. स्पोर्टी राइडिंगसाठी हे अधिक योग्य आहे. शिवाय, हायवे किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात ही बाईक अधिक चांगली ठरते. मात्र, जास्त RPM मुळे इंधन वापर (मायलेज) किंचित वाढू शकतो. डिझाइनच्या बाबतीत कंपनीने मोठे बदल केलेले नाहीत. बाईकचा एग्रेसिव्ह आणि मस्क्युलर लुक कायम ठेवण्यात आला आहे.

मुख्य फीचर्स: LED हेडलाइट आणि DRLs, USD फ्रंट फोर्क्स, स्प्लिट सीट आणि अंडरबेली एग्झॉस्ट, डिजिटल डिस्प्ले, ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल असे फीचर्स यात मिळतात. याशिवाय, Road, Rain, Sport, Off-road असे रायडिंग मोड्सही दिले आहेत. या सर्व फीचर्समुळे बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये आपली जागा मजबूत करते.

कंपनीने नवीन 350cc मॉडेलची किंमत जवळपास जुन्या 400cc व्हर्जनइतकीच ठेवली आहे. यामुळे ग्राहकांना कमी कराचा फायदा अप्रत्यक्ष मिळतो. किंमतीत मोठा फरक जाणवत नाही, पण अधिक संतुलित आणि अपडेटेड तंत्रज्ञान असलेली बाईक मिळते

















