जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोल ...
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपट आणि ६० हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारली होती. मूळ गाव असलेल्या रुई (ता.हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेची नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. चौका-चौकांत होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टीकर्स लावावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई य ...
टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे यापेक्षा मोठा विनोद कोणता, अशा शब्दांत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला फटकारले. शेतकऱ्यांवर बोलायला भाजपवाल्यांना दुसरे कोणी सर्वज्ञ मिळाले नाही का, असा टोलाही त्यांनी ल ...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली आहे, ती उठवण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडावी, आरक्षण निर्णय होई पर्यंत कोणतीही नोकर भर्ती करू नये यामागणीसाठी बुधवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव टोलनाका येथे शिरोळ तालुका मरा ...
जिल्हा बँकेच्या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च बँक देणार आहे. त्याचबरोबर कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मागे हिमालयासारखे राहू, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यां ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी येथील आर.के.कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शहरातील महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले. ...
मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनामुळे बाधित झालेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांच्याशी घनिष्ठ नाते असलेले कोल्हापूरकर हळहळले, गहिवरले. निगर्वी, मनमिळावू आणि प्रतिभावंत कलावंत असले ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. ...