तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे. ...
साक्षर भारत योजनेंतर्गत गावांत कार्यरत प्रेरकांना सेवेत नियमित करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साक्षर प्रेरक-प्रेरिका संघाच्यावतीने आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी प्रेरकांच्या मागण्या शासनाप ...
तिरोडा तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेत ...
लगतच्या छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून घरून निघून येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय तरूणीला रेल्वे सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. तिची चौकशी करून तिच्या घरी माहिती पोहोचविली व ओळख पटल्यावर तिला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले. ...
खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषद शाळांनी कात टाकत गुणवत्तेत सुधारणा केली. त्याचे चांगले फलित सद्धा पहायला मिळाले. मात्र जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकडे शिक्षण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष झाले असून जिल्ह्यातील तब् ...
जीर्ण अवस्थेत असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बघता पंंंंंंचायत समितीद्वारे मिळालेले स्वत:चे क्वॉर्टर रुग्णांच्या सोईकरिता बुधवारी (दि.१८) पंचायत समिती समिती सभापती सुनंदा बहेकार यांनी वैद्यकीय अधीक्षक गुल्हाने यांचे स्वाधीन केले. ...
शासकीय रूग्णालयातील अव्यवस्था व रूग्णांचे होत असलेले हाल याबाबत माहिती मिळताच आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील स्थिती बघता आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेत ...
येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. हीच बाब ओळखत पर्यटक संकुल विकासासाठी शासनाने सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र यानंतरही पर्यटन संकुल परिसरातील विकास कामांना सुरूवात झाली नसून ...