Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:39 IST2026-04-16T15:37:48+5:302026-04-16T15:39:23+5:30

Brick worker desi jugaad viral video: व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतायत, 'याला नासामध्ये पाठवा...'

Video desi Jugaad Laborer makes intelligence to lift more bricks at a time engineers are also surprised | Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण

Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण

Brick worker desi jugaad viral video: सोशल मीडियावर कधी गमतीशीर व्हिडिओ, तर कधी आश्चर्यकारक क्लिप्स पाहायला मिळाला. काही वेळा तर काही व्हिडीओ विचार करायला लावणारेही असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे. भारतात 'जुगाड'ची कमतरता नाही. मजुराने विटा उचलण्याचे कष्ट कमी करण्यासाठी एक सोपे पण अत्यंत प्रभावी साधन तयार केले आहे. हा व्हिडीओ पाहून सारेच थक्क झाले आहेत.

व्हिडिओमध्ये नेमके काय?

व्हिडिओमध्ये दिसते की, एका व्यक्तीने लोखंडी सळ्या किंवा लाकडी पट्ट्यांच्या मदतीने एक साचा (Clamp) तयार केला आहे. या साच्याच्या मदतीने तो एकाच वेळी ८ ते १० विटा अगदी सहजपणे पकडू शकतो. सामान्यतः मजुरांना हाताने एक-दोन विटा उचलाव्या लागतात किंवा डोक्यावर पाटी वाहून न्यावी लागते. मात्र, या 'जुगाड'मुळे विटा उचलणे सोपे झाले असून हाताला जखम होण्याची भीतीही कमी झाली आहे. पाहा व्हिडीओ-

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, गरज ही शोधाची जननी असते, हे याने सिद्ध केले. तर दुसऱ्याने मजेशीरपणे लिहिले की, हा माणूस नासा (NASA) मध्ये असायला हवा होता.

 

Web Title : अद्भुत जुगाड़! एक साथ ज्यादा ईंटें उठाने का मजदूर का तरीका देख इंजीनियर हैरान।

Web Summary : एक ईंट कार्यकर्ता का 'जुगाड़' वायरल हो रहा है। उन्होंने एक बार में 8-10 ईंटें उठाने के लिए एक क्लैंप बनाया, जिससे श्रम और चोट का खतरा कम हो गया। इस सरल लेकिन प्रभावी आविष्कार की सरलता के लिए सराहना की जा रही है।

Web Title : Ingenious innovation! Laborer's trick to lift more bricks stuns engineers.

Web Summary : A brick worker's 'jugaad' (makeshift solution) is going viral. He created a clamp to lift 8-10 bricks at once, reducing labor and injury risk. This simple yet effective invention is being praised for its ingenuity.