तालुक्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी रमेश आंबेपवार यांचा मुलगा अंकित याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे. ...
आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे. ...
वऱ्हाडी कवितांनी पुसदकरांना पोट धरून हसविले. निमित्त होते. होळीच्या रंगारंग रंगोत्सव कार्यक्रमाचे. पतंजली योग परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा भारत पुसद तालुका प्रभारी प्रवीण मस्के यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात संगणकीय प्रणालीद्वारेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यांची सरमिसळ केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अध ...
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. ...
वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्या यवतमाळ जिल्याच्या कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली होती. दुःखावर मात करत वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी ...
ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच ...