रेतीची सहा वाहने महसूलच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 09:50 PM2019-03-27T21:50:23+5:302019-03-27T21:50:42+5:30

ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच अन्य ठिकाणाहून रेती आणणाऱ्या तस्करांची पळापळदेखिल झाली.

Six vehicles in the revenues of the sand | रेतीची सहा वाहने महसूलच्या ताब्यात

रेतीची सहा वाहने महसूलच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देतस्करीची शंका : तहसीलदार, एसडीओंची संयुक्त कारवाई, तस्करांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच अन्य ठिकाणाहून रेती आणणाऱ्या तस्करांची पळापळदेखिल झाली.
उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे व तहसीलदार श्याम धनमने हे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शासकीय कामासाठी येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या मार्गाने जात असताना त्यांना अचानक समोरून एकाचवेळी रेतीने भरलेले पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक अशी सहा वाहने दिसली. शंका आल्याने त्यांनी या वाहनांना अडवून विचारपूस केली असता, रेती वाहतूक करणाºया चालकांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ही सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली. वृत्त लिहीस्तोवर या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती. मात्र नेमकी ही रेती वाहतूक अवैध होती की, वैध होती हे अद्याप समोर आले नाही. महसूल विभागाच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका पासवर रेतीची एकच फेरी करता येते. परंतु रेती कंत्राटदार महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून एका पासवर रेती वाहतुकीच्या अनेक फेºया मारत असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी पकडलेली वाहने नेमकी याच नियमात अडकल्याची माहिती मिळाली आहे.
पकडण्यात आलेल्यांपैकी काही वाहनातून चंद्रपूर येथून रेती आणण्यात आली, तर काही वाहनात वणी परिसरातील रेती होती. यासंदर्भात तहसीलदार श्याम धनमने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. कागदपत्रांची तपासणी सुरू असून यात दोषी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. वणी तालुक्यात केवळ एकच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. रेतीची उपलब्धता नसल्याने शासकीय घरकुलांचे बांधकामदेखिल थांबले आहे. खासगी कंत्राटदारांना मात्र मुबलक प्रमाणात रेती मिळत असल्याने कमालिचे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकाच पासवर रेतीच्या अनेक फेºया मारण्याचा प्रकार सर्रास या परिसरात सुरू आहे. हे नियमबाह्य असले तरी रेती कंत्राटदार त्याला जुमानत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. महसूल विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा रेती तस्कर घेत आहेत.

Web Title: Six vehicles in the revenues of the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू