सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:45 PM2024-05-13T21:45:15+5:302024-05-13T21:53:58+5:30

Lok Sabha Elections 2024 : जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला. 

Sharad Pawar realized that Supriya Sule could not take the party much further...; Amit Shah obviously | सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले

सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले

Amit Shah : मुंबई : सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचे ठरवले असावे, असे  केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे, जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला. 

'एबीपी माझा'ला अमित शाह यांनी मुलाखत दिली. यावेळी भारतात सर्व लोकांनी एकच निश्चय केला आहे की, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. पूर्व आणि दक्षिणमध्ये भाजपा आपले सर्वाधित चांगले प्रदर्शन करत आहे. बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्रप्रदेशात, तामिळनाडूमध्ये भाजपाच्या जागा वाढतील अशा विश्वास व्यक्त करत केरळमध्ये सुद्धा आता अकाऊंट ओपन केले आहे. त्यामुळे ४०० पारसोबत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यात कोणतीच शंका नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही अमित शाह यांनी भाष्य केले. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सर्व प्रादेशिक पक्ष कांग्रेसमध्ये विलिन होतील असेल म्हटले होते. यावर अमित शाह म्हणाले, सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी असे ठरवले असेल. तसेच, शरद पवार जर त्यांच्या मुलीच्या जागी अजित पवारांनी संधी दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती, तर त्यांचा पक्ष कधीच फुटला नसता. पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला. 

उद्धव ठाकरे यांच्यावरही अमित शाह यांनी निशाणा साधला. गेल्या निवडणुकीत त्यांनी माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सहमती दर्शविली होती. निवडणुकीनंतर त्यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचा मोह आला. त्याला आम्ही काही करू शकत नव्हतो. त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय होता. पंरतु बाळासाहेबांच्या विचारांना सोडून ते काँग्रेस आणि शरद परवारांसोबत गेले. आज औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्याला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन बसले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेबांचा आत्मा दु:खी झाला असेल की नाही, असा सवाल करत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

देशात मोदी लाट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त आहे. इंडिया आघाडीचे नेते आपला नेताच स्पष्ट करत नाही. धोरण निश्चत करत नाहीत. राहुल गांधी म्हणतात की, आम्ही मुस्लीम पर्सनल लॉ घेऊन येऊ. त्याला उद्धव ठाकरे समहत नाहीत. नाना पटोले म्हणतात, राम जन्मभूमीचे शुद्धीकरण करू. पण, त्यांना माहिती नाही की, ज्या ठिकाणी राम बसलाय, ती जागा तुम्ही काय शुद्ध करणार. रामाची उपस्थिती आपल्या देशात पवित्र मानली जाते. या लोकांना देशाच्या संस्कारीची माहिती नाही, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. 

दरम्यान, राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं असून 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य हे मतदानपेटीत बंद झालं आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाण्यासह नाशिक, धुळ्यामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे धुळ्यात आज आज अमित शाह आले होते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा पार पडली. 

Web Title: Sharad Pawar realized that Supriya Sule could not take the party much further...; Amit Shah obviously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.