Next

फक्त दोरीच्या उड्या मारून फिट कसे रहाल | Weight Loss Best Exercise | Skipping Benefits

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 11:02 AM2021-04-09T11:02:31+5:302021-04-09T11:02:57+5:30

आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण तासनतास जीममध्ये घाम गाळतो. सध्या लॉकडाऊनमुळे जिम बंद आहेत आणि व्यायाम करताना बऱ्याच जणांना अडचण होते. काही जणांकडे स्पेस नाहीये तर काही जणांना वेळ द्यायला जमत नाहीये. जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा कित्येक पटीनं चांगला आहे हा व्यायाम प्रकार, तो म्हणजे दोरीच्या उड्या. कुटुंबातील सर्वजण हा व्यायाम करू शकतात. यामुळे फिटनेस चांगला राहतो. तसेच शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी होते. शरीराला चांगला आकार प्राप्त होतो. विशेष म्हणजे या व्यायामासाठी जागा, विशेष खर्च, खूप जास्त वेळ असे काहीच लागत नसल्यानं तो कोणालाही सहज करता येऊ शकतो. दोरी उड्या मारायचे काय फायदे आहेत, कोणी ते मारू नये आणि दोरी उद्या मारताना कोणते नियम पाळावेत ते पाहुयात :