Next

घरच्या घरी वॅक्सिंग कशी कराल? How to do Home Waxing? Sugar waxing | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 06:07 PM2021-04-08T18:07:51+5:302021-04-08T18:08:13+5:30

साखरेपासून घरच्या घरी वॅक्स तयार करून वॅक्सिंग करू शकता. या पद्धतीला शुगरिंग असं म्हणतात. जाणून घेऊया शुगरिंग नक्की आहे तरी काय? आणि याचा वापर नेमका करतात तरी कसा? शरीरावरील नको असलेले केस हटवण्यासाठी ही नैसर्गिक आणि अत्यंत सोपी पद्धत आहे. यामध्ये साखर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून वॅक्स तयार करण्यात येतं. जे त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं . कसं कराल शुगर वॅक्स: अर्धा कप साखर आणि १ लिंबाचा रस एकत्र करून घ्या. आता यामध्ये अर्धा कप पाणी एकत्र करून मिक्सर मधून काढून घ्या. हे तोपर्यंत ब्लेंड करा जोपर्यंत याची एक स्टिकी पेस्ट तयार होत नाही. एका स्पॅच्युलाच्या मदतीने तयार पेस्ट हातांवर लावा. त्यानंतर थोडीशी पेस्ट केसांच्या विरूद्ध दिशेला लावा. पेस्ट थोडी सुकल्यानंतर केसांच्या विरूद्ध दिशेन काढून टाका.