Next

कोल्हापुरातील एका गोठ्यात गायीने दिला ३ वासरांना जन्म | The cow gave birth to 3 calves in Kolhapur

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 10:23 AM2022-03-04T10:23:46+5:302022-03-04T10:24:11+5:30

शेतकरी आपल्या घरच्या दूध दुभत्या जनावरांना नेहमीच जपत असतात. गायिंसाठीचा खूराक, चारा, या सगळ्याची पुरतता करण्यासाठी दिवसरात्र शेतकरी राबत असतो. कोल्हापुरात मधील सरुड येथे एक अजब प्रकार गावकऱ्यांना पाहायला मिळाला आहे. (गाय आणि 3 वासरू व्हिडिओ ) गायीने चक्क एका वेळी एका वासराला तसेच दोन वासरांना जन्म दिल्याचे ऐकले होते. पण शाहूवाडीच्या सरुड गावातील एका गायीने चक्क तीन गोंडस वासरांना जन्म दिला आहे. गावकऱ्यांसह पंचक्रोशीत या तीन वासरांची चर्चा केली जात असून बघायला ही अनेकांनी गर्दी केली आहे. #Kolhapur #Maharashtranews #Cowgavebirth #Lokmat