Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:22 IST2026-05-18T12:17:42+5:302026-05-18T12:22:11+5:30

Pavala Shyamala : तेलुगू अभिनेत्री पावला श्यामला या १९८५ पासून अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेली काही वर्षे या अभिनेत्रीसाठी अत्यंत खडतर राहिली आहेत, कारण त्या सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.

Pavala Shyamala senior actress found on street after being turned away by hospital receives aid | Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार

Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार

तेलुगू अभिनेत्री पावला श्यामला या १९८५ पासून अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेली काही वर्षे या अभिनेत्रीसाठी अत्यंत खडतर राहिली आहेत, कारण त्या सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. पैसे नसल्यामुळे त्यांना एका रुग्णालयातून परत पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्या पोलिसांना रस्त्यावर अत्यंत असहाय्य अवस्थेत सापडल्या. आता प्रसिद्ध निर्माते दिल राजू त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. 

दिल राजू यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, श्यामला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. पैशांची कमतरता असल्यामुळे रुग्णालयाने त्यांना उपचार न करताच परत जाण्यास सांगितलं आणि एका टॅक्सीत बसवून दिलं. टॅक्सी चालकानेही त्यांना मध्यरात्री एका चौकात सोडून दिलं. तिथून जाणाऱ्या काही स्थानिक नागरिकांनी त्यांना फुटपाथवर पाहिलं आणि तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना 'आरके फाउंडेशनमध्ये पोहोचवलं.

Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक

दिल राजू यांनी दिला मदतीचा हात

सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच, निर्माते आणि चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष दिल राजू त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी तात्काळ आपल्या टीमला रुग्णालयात पाठवलं, जेणेकरून ते डॉक्टरांशी चर्चा करू शकतील आणि श्यामला यांना योग्य उपचार मिळतील याची खात्री करतील. दरम्यान श्यामला यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या आणि त्यांची मुलगी, निर्माते दिल राजू आणि त्यांच्या टीमने केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना भावूक झाल्याचं दिसत आहेत.

'आरके फाउंडेशन'चे डॉ. रामकृष्ण यांनी 'सियासत' या डिजिटल पोर्टलशी बोलताना सांगितलं की, "गेल्या दोन-तीन वर्षांपासून या अभिनेत्रीवर आमच्या फाउंडेशनमध्ये मोफत उपचार सुरू आहेत. मात्र, आमच्या फाउंडेशनमध्ये हृदयासंबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी विशेष सुविधा नसल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागलं होतं."

संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'

गंभीर आजारपण आणि गरिबी

श्यामला यांच्यावर आर्थिक संकट ओढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर २०२५ मध्ये 'डीसी'ने आपल्या अहवालात म्हटलं होतं की, ही अभिनेत्री गंभीर आजारपण आणि गरिबीमुळे अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. अभिनेत्री आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या राहत्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं, ज्यामुळे त्या रस्त्यावर आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्यापासून वाचवलं आणि एका सेवाभावी संस्थेत राहायला पाठवलं होतं.

अनेक चित्रपटांमध्ये केलं काम

गेल्या अनेक वर्षांत श्यामला यांनी 'गोलीमार', 'खडगम', 'आंध्रवाला' आणि 'वर्षम' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी चिरंजीवी, प्रभास, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. २०१९ मध्ये आलेला 'माथु वदलारा' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांच्या काही दृश्यांचे मीम्स देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहेत.

Web Title : पैसे की कमी से जूझ रही अभिनेत्री को नहीं मिला इलाज, मदद के लिए आगे आए निर्माता

Web Summary : आर्थिक तंगी से जूझ रही तेलुगू अभिनेत्री पावला श्यामला को अस्पताल ने इलाज से इनकार कर दिया। सड़क पर बेसहारा मिलने के बाद निर्माता दिल राजू ने मदद की। श्यामला को सालों से मुफ्त इलाज मिल रहा था, लेकिन हृदय संबंधी विशेष देखभाल की जरूरत थी। राजू की टीम ने उचित चिकित्सा सहायता सुनिश्चित की। उन्होंने कई फिल्मों में काम किया।

Web Title : Veteran Actress Denied Treatment, Finds Herself Destitute; Help Arrives.

Web Summary : Telugu actress Pavala Shyamala, facing financial struggles, was denied hospital treatment. Producer Dil Raju intervened after she was found helpless. Shyamala had been receiving free treatment for years, but needed specialized cardiac care. Raju's team ensured proper medical assistance. She acted in many films with well-known stars.