'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:26 IST2026-05-18T12:25:48+5:302026-05-18T12:26:18+5:30
'सैराट'नंतर १०० कोटी कमावणारा 'राजा शिवाजी' हा मराठीतील दुसरा सिनेमा ठरला आहे. आता 'राजा शिवाजी' सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
Raja Shivaji: रितेश देशमुखच्य 'राजा शिवाजी' सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १७ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 'सैराट'नंतर १०० कोटी कमावणारा 'राजा शिवाजी' हा मराठीतील दुसरा सिनेमा ठरला आहे. आता 'राजा शिवाजी' सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
१ मे रोजी प्रदर्शित झालेला 'राजा शिवाजी' चित्रपट मराठी सिनेमांसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. अवघ्या १७ दिवसांतच 'राजा शिवाजी' सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. या सिनेमाने जगभरात १००.०७ कोटींचा गल्ला जमवला आहे. नवा रेकॉर्ड बनवण्यासाठी आणि नागराज मंजुळेंच्या सैराटचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 'राजा शिवाजी' आता काही पावलंच दूर आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट सिनेमाने एकूण ११० कोटींची कमाई करत नवा बेंचमार्क सेट केला होता. आता तब्बल १० वर्षांनी 'राजा शिवाजी' हा रेकॉर्ड मोडून नवा विक्रम करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
'राजा शिवाजी' सिनेमातून आत्तापर्यंत कधीही न दाखवलेला छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुखमे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासोबतच चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरदीन खान, संजय दत्त, भाग्यश्री या बॉलिवूड कलाकारांच्या 'राजा शिवाजी'मध्ये मुख्य भूमिका आहेत.