"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:54 IST2026-05-18T12:53:42+5:302026-05-18T12:54:08+5:30

१४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणीने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. हे प्रकरण हुंडाबळीचं असल्याचं सांगितलं जात असून दीपिकाच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.

greater noida married woman died by after jumping from rooftop | "दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा

"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा

ग्रेटर नोएडा येथे १४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणीने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. हे प्रकरण हुंडाबळीचं असल्याचं सांगितलं जात असून दीपिकाच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सासरा आणि पतीला अटक केली आहे. दीपिकाच्या काकांनी मोठा दावा केला आहे. दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या असं सांगितलं आहे. 

दीपिका नागर नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. दीपिकाचे वडील संजय यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांनी आपल्या मुलीचं लग्न ११ डिसेंबर २०२४ रोजी जलपुरा येथील रहिवासी ऋतिक याच्याशी लावून दिलं होतं. संजय यांच्या सांगण्यानुसार, लग्नात त्यांनी तब्बल १ कोटी रुपये खर्च केले होते. असं असूनही सासरचे लोक सातत्याने हुंड्यामध्ये एक फॉर्च्युनर गाडी आणि ५० लाख रुपयांची मागणी करत होते. ते दीपिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचे. वडिलांनी अनेकदा मुलगी आणि सासरच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला होता.

शरीरावर होत्या जखमांच्या खुणा

दीपिकाच्या काकांनी एनडीटीवीशी बोलताना केलेले खुलासे खरोखरच धक्कादायक आहेत. काकांनी दीपिकाच्या सासरच्यांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आली आहे आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी माझ्या पुतणीचा छळ केला.

हुंड्यात हवे होते पैसे

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी मुलगी दीपिकाने त्यांना फोन करून सांगितलं होतं की, सासरचे लोक तिला मारहाण करत आहेत आणि हुंड्यात गाडी व पैसे आणण्यास सांगत आहेत. संध्याकाळी संजय सासरच्या घरी गेले आणि चर्चा करून परत आले. रात्री त्यांना फोन आला की दीपिका छतावरून पडली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगण्यात आलं. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या.

सासरा आणि पतीला अटक

वडिलांनी आरोप केला आहे की, सासरच्या लोकांनीच दीपिकाची हत्या करून तिचा मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिला. या प्रकरणात पीडित वडिलांनी सासरा मनोज, सासू पूनम, पती ऋतिक, नणंद नेहा व तन्वी, आणि चुलत सासरे प्रमोद व विनोद यांच्याविरुद्ध लेखी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपी सासरा आणि पतीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. विवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 

Web Title : दहेज हत्या: महिला के शरीर पर चोट के निशान, परिवार का आरोप

Web Summary : ग्रेटर नोएडा में एक युवती की मौत, जिसे पहले आत्महत्या माना गया, अब दहेज हत्या के रूप में जांच की जा रही है। परिवार ने हत्या का आरोप लगाया है, जिसमें लगातार दहेज की मांग और शारीरिक शोषण का हवाला दिया गया है। पुलिस ने ससुर और पति को गिरफ्तार किया।

Web Title : Dowry death: Woman's body found with injury marks, alleges family

Web Summary : A young woman's death in Greater Noida, initially ruled suicide, is now investigated as a dowry death. The family alleges murder, citing constant dowry demands and physical abuse. Police arrested the father-in-law and husband after finding injury marks on the body.