अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:47 IST2026-05-18T12:46:20+5:302026-05-18T12:47:32+5:30
कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ-निवेदिता सराफ यांच्या एन्ट्रीने अख्खा महाराष्ट्र भारावून गेला.

अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
कान्स फिल्म फेस्टिवल २०२६ मध्ये सध्या मराठी कलाकारांचाही डंका आहे. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, पत्नी निवेदिता सराफ यांनी काल कान्स मधील रेड कार्पेटवर पदार्पण केलं. मराठमोळ्या लूकमध्ये त्यांनी हजेरी लावली आणि मराठीचं प्रतिनिधित्व केलं. अभिजात मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ग्लोबल लाँचसाठी अशोर सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर आणि अभिजात मराठीचे केदार जोशी तिथे पोहोचले होते. त्यांच्या उपस्थितीने मराठी म्हणून सर्वांचीच मान उंचावली. दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांचा मुलगाही कान्समध्ये होता. त्याने आईवडिलांसोबत फोटो शेअर केले आहेत.
कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ-निवेदिता सराफ यांच्या एन्ट्रीने अख्खा महाराष्ट्र भारावून गेला. निवेदिता सराफ यांनी हिरवी काठापदराती साडी नेसली होती. त्यावर फुलांची सुंदर डिझाईन होती. केसात गजरा, गळ्यात हार, नथ असा त्यांचा पारंपरिक लूक होता. त्यांचा मुलगा अनिकेत सराफही आईवडिलांसोबत कान्समध्ये होता. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत ज्यात त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. त्यालाही आईवडिलांचा अभिमान वाटत आहे. तर आईचा सोलो फोटो शेअर करत त्याने 'किती सुंदर' असं कॅप्शन दिलं आहे.

अनिकेत सराफ बऱ्याच वर्षांपासून परदेशात वास्तव्यास आहे. तो शेफ म्हणून काम करत आहे. पॅरिसमध्येच त्याने शिक्षण घेतलं आहे. नंतर तो लंडनला शिफ्ट झाला. अनेकदा अशोक सराफ आणि निवेदिता लेकाला भेटण्यासाठी युकेला जातात. अनिकेतला लिखाणाची आणि बेकिंगचीही आवड आहे. तसंच तो अँग्लोफिलियाचा अभ्यासक आहे असं त्याने त्याच्या बायकोमध्ये लिहिलं आहे.