नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका

By कोमल खांबे | Updated: May 18, 2026 13:16 IST2026-05-18T13:16:31+5:302026-05-18T13:16:57+5:30

नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक करत प्राजक्ता कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली. नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, पायात पैंजण असा अस्सल पारंपरिक लूक प्राजक्ताने केला होता.

cannes 2026 prajakta mali nauwari saree marathi look in red carpet video viral | नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका

नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका

Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीही सहभागी झाली आहे. नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक करत प्राजक्ता कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली. नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, पायात पैंजण असा अस्सल पारंपरिक लूक प्राजक्ताने केला होता. निळ्या रंगाच्या नऊवारीत प्राजक्ताचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. रेड कार्पेटवर प्राजक्ताची एन्ट्री होताच सगळे तिच्याकडे पाहतच राहिले. 

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रावरुन कान्स फिल्म फेस्टिव्हलचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नऊवारी नेसून मराठमोळा लूक केलेली प्राजक्ता रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसत आहे. प्राजक्ताने पदर फ्लॉन्ट करत तिचा जलवाही दाखवला. कान्समधील प्राजक्ताचा व्हिडीओ बघून चाहतेही खूश झाले आहेत. चाहत्यांनाही तिचा लूक भयंकर आवडला आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता म्हणते, "कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ-नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे आणि अशा प्रकारे मराठीने कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण. या आधी जे मराठी कलाकार कान्सला गेले ते हिंदी-हिंग्लीश चित्रपट किंवा वेगळ्या रेड कार्पेटवर चालले. {तिथे ४-५ वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये फिल्म्स चालू असतात.} आम्ही मराठी कलाकार - मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो; ह्याचा अत्यानंद". 


प्राजक्ता माळीसोबत कान्स फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर यांनीही हजेरी लावली. अभिजात मराठी ओटीटी या प्लॅटफॉर्मचं जागतिक लाँच करण्यासाठी हे कलाकार कान्समध्ये गेले होते. कान्समधील त्यांचे फोटो आणि रेड कार्पेटवरील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

Web Title : पारंपरिक मराठी परिधान में प्राजक्ता माळी ने कान्स में बिखेरा जलवा।

Web Summary : प्राजक्ता माळी ने नौवारी साड़ी पहनकर कान्स फिल्म फेस्टिवल में मराठी संस्कृति का प्रदर्शन किया। उन्होंने अंतर्राष्ट्रीय मंच पर मराठी सिनेमा और भाषा का प्रतिनिधित्व करने पर खुशी व्यक्त की, जो अभिजात मराठी ओटीटी के वैश्विक लॉन्च के लिए उपस्थित हुईं।

Web Title : Prajakta Mali stuns at Cannes in traditional Marathi attire.

Web Summary : Prajakta Mali graced Cannes Film Festival in a Nauvari saree, showcasing Marathi culture. She expressed joy in representing Marathi cinema and language on an international platform, attending for the global launch of Abhijat Marathi OTT.