Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 10:45 IST2026-05-18T09:53:02+5:302026-05-18T10:45:19+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
18 May, 26 : 10:47 AM
सोलापुरमध्ये कार टेम्पोचा अपघात, दोन ठार
सोलापूर -पुणे महामार्गावरील कोंडी येथील चूल हॉटेल समोर कार आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
18 May, 26 : 10:19 AM
डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
"वेळ वेगाने निघून चालली आहे आणि इराणकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. जर त्यांनी अणू कराराबाबत तातडीने एखादा चांगला प्रस्ताव दिला नाही, तर अमेरिका त्यांच्यावर आधीपेक्षाही मोठा लष्करी हल्ला करेल. जर वेळीच निर्णय घेतला नाही, तर इराणमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही..." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सोशल मीडियावरून इराणला दिलेला हा इशारा सध्या जगभरात भीतीचे वातावरण पसरवत आहे. अमेरिका आणि इराणमधील अणू कराराची चर्चा फिस्कटल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
18 May, 26 : 10:18 AM
शिवराज मोटेगावकर यांना नीट पेपर फुटीप्रकरणात पोलिसांनी घेतले ताब्यात
लातूरसह मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नीट पेपर फुटीप्रकरणाचा सीबीआय तपास करत असून, २८ अधिकाऱ्यांचे पथक संशयितांवर नजर ठेवून आहे. शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेऊन ८ ते १० तास चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
18 May, 26 : 10:17 AM
पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग
बिहारमधील सासाराम रेल्वे स्टेशनवर सोमवारच्या पहाटे प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर उभी असलेल्या सासाराम-पटना फास्ट पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ५३२१२)च्या एका बोगीला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीच्या ज्वाला एवढ्या वेगाने पसरल्या की, ट्रेनची पाचवी बोगी पूर्णपणे जळून खाक झाली, तर चौथ्या बोगीचा मागचा भागही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये गदारोळ माजला आणि प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
18 May, 26 : 10:12 AM
शेअर बाजारात खळबळ...
आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्समध्ये ८१४ अंकांची घसरण, तर निफ्टीही २७१ अंकांनी घसरला
#WATCH | Mumbai: Market remains in Red. Sensex down by 814.14 points, currently trading at 74,423.85. Nifty down by 271.90 points, trading at 23,371. 60
— ANI (@ANI) May 18, 2026
(Visuals from outside Bombay Stock Exchange) pic.twitter.com/RtrI4uPbk7
18 May, 26 : 10:02 AM
बिहारमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार...
बिहारमध्ये सासाराम-पाटणा पेसेंजर एक्स्प्रेसला भीषण आग, ट्रेनचे दोन कोच जळून खाक
#WATCH | Sasaram, Bihar: Fire broke out in a coach of the Sasaram-Patna Passenger train. Firefighters have brought the fire under control. No casualties were reported pic.twitter.com/dUpxSUkG1R
— ANI (@ANI) May 18, 2026