Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 09:27 IST2026-05-18T09:24:34+5:302026-05-18T09:27:38+5:30

गोमतीनगर रेल्वे स्थानकावर आलेल्या एका एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे अनेक तुकडे केले गेले आणि नंतर ते पेटीत भरले गेले.

Crime News: Upon opening the letter box found in the train, the headless body of a young woman was found, in many pieces; There was a commotion at Gomtinagar railway station | Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ

Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ

गाडी क्रमांक १५११४ छपरा-गोमतीनगर एक्स्प्रेस रात्री रेल्वे स्थानकावर आली. प्रवासी उतरल्यानंतर सफाई कर्मचारी आत शिरले. साफसफाई करत असतानाच एक पत्र्याची पेटी दिसली. तिच्यावर रक्ताचे डाग लागलेले होते. कर्मचाऱ्यांनी अधिकारी आणि रेल्वेपोलिसांना माहिती दिली. पेटी उघडताच त्यात तरुणीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. उत्तर प्रदेशातील गोमतीनगर रेल्वे स्थानकावर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस रेल्वे छपरावरून गोमतीनगरला रविवारी रात्री पोहोचली होती. सर्व प्रवासी उतरल्यानंतर रेल्वे कर्मचारी साफसफाई करण्यासाठी आत शिरले होते. एस-१ डब्यात सफाई करत असताना कर्मचाऱ्यांना एका सीटखाली पत्र्याची पेटी आणि एक बेवारस बॅग दिसली.

पेटी उघडताच दिसले मृतदेहाचे तुकडे

पेटीवर रक्ताचे डाग होते. त्यामुळे कर्मचारी घाबरले आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांना बोलवण्यात आले. त्यानंतर पेटी उघडण्यात आली. पेटीच्या आतमध्ये जे होतं, ते बघून सगळ्यांनाच घाम फुटला. 

एका ३० ते ३५ वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे पेटीत होते. सगळी पेटी रक्ताने माखलेली होती आणि शेजारी असलेल्या बॅगमध्ये तरुणीचे कापून ठेवलेले हात आणि पाय होते होते. त्याचबरोबर इतरही काम सामान पोलिसांना मिळाले. 

मृतदेहाचे शीरच नसल्याने तरुणीचे ओळख पटवता आलेली नाही. पोलिसांनी तातडीने अनेक तुकड्यांमध्ये असलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 

गळा कापून हत्या केल्याचा संशय

मृतदेह सापडलेल्या तरुणीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. ही पेटी कोणत्या रेल्वे स्थानकातून ठेवण्यात आली आणि ती कोणी ठेवली याचाही शोध सीसीटीव्हीच्या मदतीने घेतला जात आहे. दरम्यान, तरुणीची गळा चिरून हत्या केली असावी आणि तिचे शीर दुसरीकडे फेकण्यात आले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

जो मृतदेह मिळाला आहे, तो दोन ते तीन दिवसांपूर्वी हत्या करून ठेवलेला असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विचार करून आरोपीने मृतदेह पेटीत भरला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Web Title : ट्रेन में मिली महिला का सिर कटा शव, रेलवे स्टेशन पर दहशत।

Web Summary : गोमती नगर स्टेशन पर एक ट्रेन में एक बॉक्स में एक युवती का सिर कटा शव मिला। शव के टुकड़े किए गए थे, जिससे जांच शुरू हो गई है। पुलिस को हत्या का संदेह है, पीड़िता और अपराधी के बारे में सुराग के लिए सीसीटीवी की तलाश है।

Web Title : Woman's headless body found in train, sparking railway station panic.

Web Summary : A headless body of a young woman was discovered in a box on a train at Gomti Nagar station. The body was dismembered, sparking an investigation. Police suspect murder, searching CCTV for clues about the victim and perpetrator.