प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?

सलग सहाव्या पराभवानंतर पंजाबच्या ताफ्यात शांतता

By सुशांत जाधव | Updated: May 18, 2026 09:08 IST2026-05-18T09:06:46+5:302026-05-18T09:08:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs RCB Preity Zinta is having a serious chat with skipper Shreyas Iyer after the team’s sixth consecutive loss Ricky Ponting appeared disappointed Watch Viral Video | प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?

प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?

 धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पंजाब किंग्सच्या संघाला २३ धावांनी पराभवाचा धक्का दिला. दिमाखदार विजयासह RCB चा संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफ्ससाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. दुसऱ्या बाजूला सलग सहाव्या पराभवानंतर पंजाब किंग्सचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. संघाच्या निराशजनक कामगिरीनंतर संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री कर्णधार श्रेयस अय्यरसोबत गंभीर चर्चा करताना दिसली. दुसाऱ्या बाजूला मुख्य कोच डगआउटमध्ये हताश होऊन बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात पराभवानंतर पंजाब किंग्सच्या ताफ्यात नेमकं काय घडलं? त्यासंदर्भात व्हायरल होणारी गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सलग सहाव्या पराभवानंतर पंजाबच्या ताफ्यात शांतता

सलग सहाव्या पराभवानंतर पंजाब किंग्सची सहमालक प्रीती झिंटा मैदानावर कर्णधार श्रेयस अय्यरसोबत चर्चा करताना दिसली. दोघांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पाहायला मिळाले. दुसरीकडे पहिल्या टप्प्यात जे कमावलं ते सर्व गमावल्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक कोणाशीही संवाद न सांगता डगआउटमध्ये शांत बसल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर पंजाब किंग्सच्या ताफ्यातील शांतता चर्चेचा विषय ठरत आहे.

RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?

धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा संघ अडखळला अन्...

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सच्या संघाने पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यात ६ विजय आणि पावसामुळे एका अनिर्णित सामन्यासह १३ गुण कमावत ट्रॉफीचे प्रबळ दावेदार असल्याचे चित्र निर्माण केले होते. पण पुढच्या सामन्यात होत्याच नव्हते झाले. सहाव्या पराभवानंतर पंजाब संघाचे स्वबळावर प्लेऑफ्सचं तिकीट मिळवण्याची आल संपली आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचे शेर सपशेल ढेर झाले. प्रियांश आर्यला खातेही उघडता आले नाही. प्रभसिमरन सिंगने १ धाव काढून तंबूचा रस्ता धरल्यावर श्रेयस अय्यर अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला. आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे पंजाबच्या संघ आता स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.  

शशांक सिंह एकटा पडला

आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यावर शशांक सिंगने २७ चेंडूत ५६ धावांच्या झुंजार खेळी करत आशा जिवंत ठेवली, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. परिणामी पंजाब किंग्सचा संघ धावांचा पाठलाग करातना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १९९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. आता लखनौ सुपर जाएंट्सविरुद्धच्या अखेरचा सामना जिंकून त्यांना १५ गुणांपर्यंत पोहचता येईल. या परिस्थितीत त्यांचे भवितव्या अन्य संघाच्या निकालावर अवलंबून असेल. 

Web Title : हार के बाद प्रीति जिंटा, श्रेयस अय्यर गंभीर चर्चा में; कोच निराश।

Web Summary : पंजाब किंग्स की हार के बाद प्रीति जिंटा और श्रेयस अय्यर गंभीर चर्चा करते दिखे। टीम के कोच निराश दिखे। खराब बल्लेबाजी प्रदर्शन के कारण प्लेऑफ की उम्मीद खतरे में।

Web Title : Preity Zinta, Shreyas Iyer in deep discussion after PBKS loss.

Web Summary : Following Punjab Kings' defeat, Preity Zinta and Shreyas Iyer were seen in serious discussion. The team's coach looked dejected. Poor batting performance led to their sixth consecutive loss, jeopardizing playoff chances.