ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:15 IST2026-05-18T11:14:10+5:302026-05-18T11:15:38+5:30

US Iran peace proposal: युद्ध थांबवण्यासाठी इराणकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास नकार दिला आहे. 

Neither compensation nor release of assets; and uranium...; Five strict US conditions on Iran's proposal | ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी

ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी

भारतासह अनेक देशांना झळा बसत असलेल्या इराण-अमेरिकायुद्धाबद्दल नवीन घडामोड घडली आहे. इराणनेयुद्ध थांबवण्यासंदर्भात अमेरिकेला शांतता प्रस्ताव दिला होता. पण, अमेरिकेने शांतता प्रस्तावातील काही मागण्या धुडकावत पाच कठोर अटी इराणसमोर ठेवल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील युद्ध थांबवण्याऐवजी आणखी लांबवण्याचीच चिन्हे दिसत आहेत. 

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी पडद्याआड हालचाली आणि वाटाघाटीच्या चर्चा सुरू आहेत. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणने अमेरिकेसमोर युद्ध थांबवण्यासाठी शांतता प्रस्ताव ठेवला होता. पण, अमेरिकेने हा प्रस्ताव पूर्णपणे बदलून टाकला आहे. याबद्दल अद्याप इराण किंवा अमेरिकेकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. 

अमेरिकेने इराणसमोर कोणत्या अटी ठेवल्या आहेत?

इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणच्या शांतता प्रस्तावावर अमेरिकेने पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे. 

१) अमेरिकेने इराणला कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई किंवा युद्धाचा दंड म्हणून रक्कम देण्यास नकार दिला आहे. 

२) इराणनने त्यांच्याजवळील ४०० किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करावे, अशी अट अमेरिकेने ठेवली आहे. 

३) इराणला त्यांच्या देशात फक्त अणुऊर्जा संयत्र चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली जाईल. 

४) इराणची इतर देशात संपत्ती आणि मालमत्ता आहेत, त्यात सध्या जप्त केलेल्या आहेत. त्या मालमत्ता आणि निधी मुक्त करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. 

५) दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीला आता तेव्हाच मुदतवाढ दिली जाईल, जेव्ही दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होईल. 

इराणवर दबाव टाकण्याचे प्रयत्न

अमेरिकेकडून इराणवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इराणने दिलेल्या शांतता प्रस्तावाचा वापर अमेरिकेने मुत्सद्दीगिरीने करत कोंडी केली आहे. यातून अमेरिकेने इराण आर्थिक बळ देण्यास नकार दिला आहे, उलट इराणचे शुद्ध युरेनियमही ताब्यात घेण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे. 

शस्त्रसंधी होऊन महिना उलटला

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारण्यात आले. इराणमध्ये राजवट बदल करण्याचा उद्देशाने अमेरिकेने हे केले मात्र, अद्यापही त्यांना यश आलेले नाही. 

त्यानंतर ८ एप्रिल २०२६ रोजी इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाली. त्यावेळी काही काळासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली होती. पण, पुन्हा संघर्ष पेटला आणि वाहतूक थांबली. ८ मे रोजी शस्त्रसंधीला महिना पूर्ण झाला पण दोन्ही देशांमध्ये अद्यापही युद्धाबद्दल तोडगा निघालेला नाही. 

Web Title : ईरान के शांति प्रस्ताव पर अमेरिका की पांच कठोर शर्तें।

Web Summary : अमेरिका ने ईरान के शांति प्रस्ताव को खारिज कर दिया, मुआवजे से इनकार, यूरेनियम समर्पण, परमाणु संयंत्र सीमाएं, संपत्ति फ्रीज और सशर्त युद्धविराम विस्तार की मांग की। ईरान पर दबाव बढ़ाने के प्रयास तेज, यूरेनियम जब्त करने और अर्थव्यवस्था कमजोर करने का लक्ष्य।

Web Title : US sets five harsh conditions for Iran peace proposal.

Web Summary : America rejected Iran's peace proposal, demanding no compensation, uranium surrender, nuclear plant limitations, asset freeze, and conditional ceasefire extension. Efforts to pressure Iran intensify, aiming to seize its uranium and weaken its economy.