"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 10:37 IST2026-05-18T10:36:53+5:302026-05-18T10:37:34+5:30
मौनीचं नक्की काय बिनसलं?, पापाराझींना म्हणाली...

"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
'नागीन' फेम अभिनेत्री मौनी रॉय सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज नांबियारसोबत तिचा घटस्फोट होत आहे. मौनी आणि सूरजचा ४ वर्षांचा संसार मोडला आहे. त्यातच दिशा आणि मौनीबद्दलच जोडून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या. या सगळ्या चर्चांमध्ये मौनी नुकतीच मुंबई विमानतळावर आली होती. एरवी पापाराझींसमोर पोज देणारी मौनी यावेळी मात्र खाली मान घालून निघून गेली.
काळ्या रंगाचा टॉप आणि प्लाझो पँट, चष्मा या लूकमध्ये मौनी विमानतळावर पोहोचली. साहजिकच घटस्फोटाच्या चर्चांमुळे पापाराझींचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्यांनी तिला फोटोसाठी थांबण्याची विनंती केली. मात्र मौनी 'मी घाईत आहे' असं सांगून पुढे गेली. पण पुढे जाऊन सिक्युरिटी चेक जवळ दुसऱ्या रांगेत जाण्यासाठी तिने बॅरिकेट काढलं तेव्हा काही सेकंदासाठी ती तिथे थांबली होती. यावेळी मौनीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. घटस्फोटामुळे मौनीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे ज्याला ती तोंड देत आहे.
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा आणि दुसरीकडे मौनी आणि दिशा पटानीचंच नाव जोडण्यात येत आहे. दोघींनी काही वर्षांपूर्वी एका मंदिरात लग्न केल्याचा फोटोही नेटकऱ्यांनी पुन्हा व्हायरल केला.. या व्हिडीओवरही कमेंट करत नेटकरी मौनीला 'लेस्बियन'म्हणत चिडवत आहेत. त्यातच मौनीच्या हातात एक पुस्तक दिसत आहे ज्यावर नेटकऱ्यांची नजर पडली. '४० रुल्स ऑफ लव्ह' असं पुस्तकाचं नाव आहे. मौनी सध्या तिला प्रायव्हसी द्यावी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चा करु नका अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती केली आहे.
मौनी आणि सूरज नांबियार यांचं २०२२ साली लग्न झालं. गोव्यात त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. सूरज बिझनेस क्षेत्रात मोठं नाव आहे. सूरजला लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता मात्र मौनीला लग्न करायचं होतं. मौनी आपल्याला सोडून जाईल या भीतीने त्याने लग्नासाठी होकार दिला होता असं तो एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता.