Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 10:33 IST2026-05-18T10:28:35+5:302026-05-18T10:33:55+5:30

Hirkani Tigress: हिरकणी वाघिणीचे (एसटीआर टी-६) गेल्या दहा दिवसांपासून जीपीएस कॉलरचे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत होते. त्यामुळे वन विभाग चिंतेत होता. पण, अखेर ती दिसली.

Hirkani Tigress: The dazzling 'Hirkani' is caught on camera again; however, the GPS collar around its neck is missing | Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब

Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब

-संदीप आडनाईक, कोल्हापूर 
गेले काही दिवस वन विभागाला चकवा देत असलेली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  ‘हिरकणी’ वाघीण अखेर विविध ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. मात्र, तिच्या गळ्यातील सॅटेलाईट जीपीएस कॉलर दिसत नसल्याने वन विभागासमोर नवे प्रश्न उभे राहिले आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून हिरकणी वाघीण (एसटीआर टी-६) हिच्या जीपीएस कॉलरचे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत होते. त्यामध्ये कोणतीही हालचाल दिसत नसल्याने वन विभागाची चिंता वाढली होती. मोठ्या प्रमाणात गस्ती पथके तैनात करून जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र हिरकणीचा ठावठिकाणा लागत नव्हता.

वाघिणीची जीपीएस कॉलर पडली

जीपीएस कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा कॉलर गळून पडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे वन्यजीव विभागाने कोअर जंगल क्षेत्रात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसवून त्यांचे विश्लेषण सुरू केले होते.

दरम्यान, कोयना परिसरातील कोअर जंगल क्षेत्रात एका वाघिणीचे दर्शन ट्रॅप कॅमेऱ्यात झाले. तिच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण केल्यानंतर ती हिरकणीच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तिच्या गळ्यात जीपीएस कॉलर दिसून आली नाही.

हिरकणीला तीन महिन्यांपूर्वी सोडले होते प्रकल्पात

७ फेब्रुवारी २०२६ रोजी हिरकणी वाघिणीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना कोअर क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले होते. सध्या ती झाडांच्या खोडांवर मूत्रविसर्जन करून स्वतःची हद्द निश्चित करत असल्याच्या खुणा वन विभागाच्या निरीक्षणात आल्या आहेत.

हिरकणी वाघिणीच्या गळ्यातील कॉलर दिसत नाही. तिने ती स्वतः पंज्याने काढून टाकली असावी किंवा तांत्रिक बिघाडामुळे कॉलर गळून पडली असावी. कॉलर अद्याप कार्यरत असून अधूनमधून सिग्नल देत आहे.
-तुषार चव्हाण (क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प)

ट्रॅप कॅमेऱ्यात आलेल्या फोटो आणि व्हिडिओमधून हिरकणीची प्रकृती सुदृढ दिसत आहे. तिचे वजनही वाढल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे.
-रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक)

Web Title : चकमा देने वाली बाघिन 'हिरकणी' फिर दिखी, जीपीएस कॉलर गायब

Web Summary : वन विभाग को चकमा देने के बाद, बाघिन 'हिरकणी' सह्याद्री टाइगर रिजर्व में कैमरा ट्रैप से देखी गई। हालांकि, उसका जीपीएस कॉलर गायब है, जिससे वन विभाग चिंतित है। कॉलर या तो खराब हो गया या बाघिन ने हटा दिया।

Web Title : Elusive Tigress 'Hirkani' Spotted Again, GPS Collar Missing

Web Summary : After evading capture, tigress 'Hirkani' was spotted via camera traps in the Sahyadri Tiger Reserve. However, her GPS collar is missing, raising concerns for the forest department. The collar either malfunctioned or was removed by the tigress.