गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:40 IST2026-05-18T11:37:10+5:302026-05-18T11:40:39+5:30

प्रद्युम्नला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याची पत्नी अर्पिता यादवला अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

Gorakhpur engineer death case; 'That' cruel wife who pushed her husband to death's door finally gets a death sentence | गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड

गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड

गोरखपूरमधील कुसमी जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेल्या ३३ वर्षीय इंजिनिअर प्रद्युम्न यादव प्रकरणात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटसवर भावूक व्हिडिओ शेअर करत प्रद्युम्नने आपल्या मृत्यूसाठी ज्या पत्नीला जबाबदार धरले होते, त्या आरोपी पत्नी अर्पिता यादव उर्फ उषा हिला गोरखपूरच्या एम्स पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी तिला ताब्यात घेतल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले, जिथून तिची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली आहे.

१४ मे रोजी संध्याकाळी प्रद्युम्नने कुसमी जंगलातील प्रसिद्ध बुढिया माई मंदिरात दर्शन घेतले होते आणि त्यानंतर जंगलात झाडाला फास लावून आपले जीवन संपवले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रद्युम्नचे मोठे भाऊ राघवेंद्र यादव यांनी एम्स पोलीस ठाण्यात भावजय अर्पिता, तिचे आई आणि वडील यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा (कलम ३०६) गुन्हा दाखल केला होता.

दिल्लीत केला होता नवऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न!

प्रद्युम्नच्या कुटुंबियांनी पोलिसांसमोर अर्पिताच्या क्रूरतेचा पाढा वाचला आहे. प्रद्युम्न आणि अर्पिताचे लग्न ९ वर्षांपूर्वी म्हणजेच २ जून २०१७ रोजी झाले होते. त्यांना ५ वर्षांची एक मुलगीही आहे. लग्नानंतर अवघे ३ महीने अर्पिता सासरी राहिली आणि नंतर माहेरी निघून गेली. ४ महिन्यांनी ती परत आल्यावर प्रद्युम्न तिला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन गेला, जिथे तो नोकरी करत होता. मात्र, कुटुंबियांच्या आरोपानुसार, दिल्लीत राहताना अर्पिताने प्रद्युम्नचा गळा दाबून त्याला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला होता. या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रद्युम्नने तिला तातडीने तिच्या माहेरी परत पाठवले होते.

हुंडा-छळाची खोटी केस आणि ३ वर्षांपासून माहेरी ठिय्या

माहेरी गेल्यानंतर अर्पिताने प्रद्युम्न आणि त्याच्या कुटुंबावर हुंडा-छळ आणि पोटगीचा खटला दाखल केला. ती गेल्या तीन वर्षांपासून मुलीला घेऊन माहेरीच राहत होती. या कोर्टबाजीमुळे आणि पत्नीकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे प्रद्युम्न प्रचंड मानसिक तणावाखाली आणि डिप्रेशनमध्ये होता. तो सध्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे नोकरी करत होता आणि प्रत्येक तारखेला त्याला रजा काढून कुशीनगर कोर्टात यावे लागत होते. १२ मे रोजी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने थेट २१ जुलैची तारीख दिली, ज्यामुळे तो पार खचून गेला होता.

"शेवटच्या वेळी लेकाला पाहूही शकले नाही..."; आईचा टाहो

प्रद्युम्नच्या आत्महत्येची बातमी गावात पोहोचल्यापासून त्याच्या वृद्ध आईचे रडून रडून हाल झाले आहेत. आईने रडत सांगितले की, "मी माझ्या मुलाला शेवटच्या वेळी डोळे भरून पाहूही शकले नाही. ३ महिन्यांपूर्वी तो घरी आला होता, तीच आमची शेवटची भेट ठरली. गावातील एका मुलाने फेसबुकवर माझ्या सोन्यासारख्या लेकाचा तो सुसाईड व्हिडिओ दाखवला, तेव्हापासून माझ्या काळजाचा थरकाप उडाला आहे. तो जाताना मलाही सोबत का घेऊन गेला नाही?" आईच्या या आर्त हाकेने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲपवर ठेवले होते स्टेटस

आत्महत्या करण्यापूर्वी प्रद्युम्नने जंगलात एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात तो म्हणाला होता, "मी आयुष्याची लढाई हारलोय यार. मला दुःख देणारी दुसरी कोणी नसून माझी पत्नी आहे. गेल्या दीड महिन्यांपासून माझ्या डोक्यात हाच विचार सुरू होता. मोठ्या भावा, आई-बाबांना कधीही भासू देऊ नकोस की, त्यांचा एक मुलगा गेला." हा व्हिडिओ स्टेटसवर ठेवून त्याने गळफास घेतला होता. आता पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीला तुरुंगात पाठवले असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा (सासरे आणि सासू) शोध सुरू केला आहे.

Web Title : गोरखपुर आत्महत्या मामले में इंजीनियर की पत्नी गिरफ्तार

Web Summary : प्रद्युम्न यादव की पत्नी अर्पिता को आत्महत्या के लिए उकसाने के आरोप में गिरफ्तार किया गया। यादव, एक इंजीनियर थे, जिन्होंने एक वीडियो में अपनी पत्नी द्वारा उत्पीड़न का हवाला देते हुए दुखद रूप से अपनी जान दे दी। अर्पिता पर दहेज उत्पीड़न और हत्या के प्रयास के आरोप हैं, परिवार ने वर्षों के दुर्व्यवहार और झूठे आरोपों का दावा किया जिससे वह परेशान थे।

Web Title : Engineer's Wife Arrested for Abetting Suicide in Gorakhpur Case

Web Summary : Pradyumn Yadav's wife, Arpita, was arrested for allegedly driving him to suicide. Yadav, an engineer, tragically ended his life, citing his wife's harassment in a video. She faces charges related to dowry harassment and attempted murder, with the family alleging years of abuse and false accusations that led to his distress.